आज जगभरात ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. जर तुम्ही या खास दिवसासाठी काही चांगल्या प्लॅनिंग विचार करत असाल, तर घरच्या घरी देखील हा दिवस आणखी खास बनवू शकता. तुम्हाला फक्त वेळ काढून तुमच्या वडिलांसोबत ओटीटीवर चित्रपटांचा आनंद घ्यायचा आहे. ओटीटीवर असे अनेक चित्रपट उपलब्ध आहेत, जे एका वडिलांच्या त्यागाची आणि त्यांच्या प्रेमाची कथा सांगतात. कोणते आहेत हे चित्रपट आणि तुम्ही ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता? चला जाणून घेऊया...
रणबीर कपूर आणि अनिल कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटात वडील आणि मुलाचे नाते दाखवण्यात आले आहे. वडिलांचे प्रेम जिंकण्यासाठी मुलगा काहीही करायला तयार होतो. तो ज्या प्रकारे सर्व मर्यादा ओलांडतो, ते याआधी क्वचितच कोणत्याही चित्रपटात पाहायला मिळाला असेल. वडिलांच्या प्रेमाची त्याला आयुष्यभर तळमळ होती. मात्र, त्याचे वडिलांवरील प्रेम कधीच कमी झाले नाही. शेवटी वडिलांनाही मुलाची त्याच्या चुकांची माफी मागावी लागते. या चित्रपटातील 'पापा मेरी जान' हे गाणे ऐकून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येते. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
'शैतान' हा एक भयपट आहे. यामध्ये अजय देवगण दोन मुलांचा बाबा दाखवण्यात आला आहे. आपल्या मुलांच्या सुखासाठी आणि सुरक्षिततेसाठी हा बाप काहीही करू शकतो. अजयने या चित्रपटात अशा वडिलांची भूमिका साकारली आहे, जो मुलांना सहलीला घेऊन जातो. जेव्हा अजय देवगणच्या मुलीवर वशिकरण केले जाते, तेव्हा अजय देवगण तिला वाचवण्यासाठी प्रत्येक कठीण मार्ग स्वीकारतो. त्यावेळी ना त्याला जीवाची पर्वा असते ना पैशाची. सरतेशेवटी, तो आपल्या मुलीवर जादू करणाऱ्या व्यक्तीचा पराभव तर करतोच पण त्याची जीभ कापून त्याला कायमचे बांधून ठेवतो आणि आपल्या मुलीवर केलेल्या सर्व अत्याचाराचा बदला घेतो. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
'हाय पापा' ही खरं तर प्रेमकथा आहे, पण जेव्हा एका जोडप्याला मुलगी असते. मात्र, जेव्हा तो मुलगा वडील म्हणून एकटा पडतो, तेव्हा तो तिची कशी काळजी घेतो, हे त्यात दाखवण्यात आले आहे. एक भयंकर आजार असलेल्या 6 वर्षांच्या मुलीची तिचे वडील कशी काळजी घेतात आणि तिचे जगणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, हे पाहून तुमचेही डोळे भरून येतील. रात्रीची झोप विसरून, काम सोडून स्वतःला विसरून, एक बाप आपल्या मुलीसाठी काहीही करतो, हे या चित्रपटात पाहायला मिळत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही उपलब्ध आहे.
तरुण मुलगा दबावाखाली येऊन चुकीचे पाऊल उचलतो, तेव्हा बापाचे काय होते, ही कथा 'छिछोरे' चित्रपटाची आहे. या चित्रपटात एक मुलगा प्रवेश परीक्षेत नापास झाल्यानंतर इतका अस्वस्थ होतो की, छतावरून त्याला उडी मारून आयुष्य जगण्यापेक्षा आत्महत्या करणे सोपे वाटते. पण त्याच्या या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर, त्याचे वडील त्याला कसे प्रेरित करतात आणि त्याच्यात कसा आत्मविश्वास निर्माण करतात, हे या चित्रपटात पाहायला मिळते. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.