मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Faruk Kabir: मुलीला घेऊन पत्नी आणि सासू विदेशी फरार होण्याच्या मार्गावर! बॉलिवूड दिग्दर्शकाने दाखल केला गुन्हा

Faruk Kabir: मुलीला घेऊन पत्नी आणि सासू विदेशी फरार होण्याच्या मार्गावर! बॉलिवूड दिग्दर्शकाने दाखल केला गुन्हा

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 02, 2024 03:55 PM IST

Faruk Kabir files Complaint Against Wife: दिग्दर्शक फारुख कबीर यांनी त्यांची पत्नी सनम आणि सासूवर आपल्या नवजात मुलीची चोरी करून देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

Faruk Kabir files Complaint Against Wife
Faruk Kabir files Complaint Against Wife

Faruk Kabir files Complaint Against Wife: बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक फारुख कबीर गेल्या वर्षी अभिनेत्री रुखसार रहमानसोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आले होते. आता दिग्दर्शकाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माता फारुख कबीर यांची पत्नी सनम आणि तिच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. फारुख कबीर यांच्या मुलीला घेऊन त्यांची पत्नी फरार होण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, पोलिसांनी तिला पकडले असून, त्या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिग्दर्शक फारुख कबीर यांनी त्यांची पत्नी सनम आणि सासूवर आपल्या नवजात मुलीची चोरी करून देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. २१ डिसेंबर रोजी फारुखने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती. सनमचे आई-वडील आपल्या नवजात मुलीसह तिच्या जन्माचा दाखला आणि इतर कागदपत्रांसह ७ लाख रुपये आणि दागिने घेऊन पळून गेल्याचे फारुख कबीर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Rakesh Bedi: आर्मी ऑफिसर सांगून लावला ७५ हजारांचा चुना; 'गदर २' फेम अभिनेता फ्रॉडचा शिकार

दिग्दर्शक फारुख कबीर यांची पत्नी सनम ही उझबेकिस्तानची आहे. दोघांनी गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये लग्न केले होते. त्यानंतर फारुखने त्यांना भारतात आणले आणि दोघेही मुंबईत एकत्र राहू लागले होते. डिसेंबरमध्ये सनमने एका मुलीला जन्म दिला. मात्र, या दरम्यानच्या काळात दोघा पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला होता. आपल्या मुलीला उझबेकिस्तानचे नागरिकत्व मिळावे अशी सनम आणि तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. परंतु, फारुखने याला विरोध केला होता.

अशा परिस्थितीत सनमने तिच्या आईसोबत आपल्या मुलीला देशाबाहेर नेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर फारुखने वर्सोवा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सनम, तिची आई दिलफुजा आणि नवजात बाळाला अमृतसरमधून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांना सनमचे वडील तेजस खन्ना सापडलेले नाहीत. त्यांचा शोध अजूनही सुरू आहे. दिग्दर्शक फारुख कबीर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, आपल्या मुलीसोबत राहण्याची परवानगी मागितली आहे.

WhatsApp channel

विभाग