बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून फरहान अख्तर ओळखला जातो. आज ९ जानेवारी रोजी फरहानचा ५० वा वाढदिवस आहे. तो एक अभिनेता असण्यासोबतच निर्माता देखील आहे. फरहानचा जन्म ९ जानेवापी १९७४ रोजी मुंबईत प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर आणि हनी ईराणी यांच्या घरी झाला. फरानला करिअरमध्ये अनेक चढ-उतारांना समोरे जावे लागले आहे. एक वेळ तर अशी होती की फरहानच्या आईनेच त्याला धमकी दिली होती.
फरहानने वयाच्या १७व्या वर्षी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २००१ साली प्रदर्शित झालेला ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत फरहानने कलाविश्वातील प्रवासाला सुरुवात केली. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला. तसेच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.पण हा चित्रपट फरहानने आईमुळे केल्याचे म्हटले जाते.
वाचा: मेहंदी सोहळ्यात आमिर खानच्या जावयाचा मराठी कलाकारांसोबत भन्नाट डान्स
कॉलेज पूर्ण झाल्यावर फरहान घरात बसून होता. तो मित्रांबरोबर मजा मस्ती करत वेळ घालवत होता. ते पाहून फरहानच्या आईने त्याला काम केले नाही तर घरातून काढून टाकण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने 'दिल चाहता है' चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा पहिलावहिला सिनेमा तुफान हिट ठरला होता.
त्यानंतर २००४ मध्ये फरहानने ‘लक्ष्य’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘दिल चाहता है’ आणि ‘लक्ष्य’ या दोन चित्रपटांनी फरहानला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती.
२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून फरहानने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्याला अवॉर्ड देखील मिळाला होता. चित्रपटातील फरहानचा अभिनय आणि गाणे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीला उतरले होते. त्यानंतर फरहानने ‘लक बाय चांस’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात काम केले. त्याच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.