Fardeen Khan: फरदीन खानने इंडस्ट्रीमधून १४ वर्षांचा मोठा ब्रेक का घेतला होता? कारण वाचून बसेल धक्का
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fardeen Khan: फरदीन खानने इंडस्ट्रीमधून १४ वर्षांचा मोठा ब्रेक का घेतला होता? कारण वाचून बसेल धक्का

Fardeen Khan: फरदीन खानने इंडस्ट्रीमधून १४ वर्षांचा मोठा ब्रेक का घेतला होता? कारण वाचून बसेल धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 17, 2024 06:08 PM IST

Fardeen Khan: बॉलिवूड अभिनेता फरदीन खानने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्याचा हा ब्रेक जवळपास १४ वर्षांचा होता. आता त्याने एका मुलाखतीत ब्रेक का घेतला हे सांगितले आहे.

फरदीन खान
फरदीन खान

बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे फरदीन खान. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर फरदीनने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर त्याने काही वर्षे इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. जवळपास १४ वर्षांनंतर फरदीनने संजय लीला भन्साळी यांच्या वेब सीरिजमधून अभिनयविश्वासत पदार्पण केले. अलीकडेच फरदीन खानने एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वक्तव्य केले आहे. त्याने इंडस्ट्रीमधून ब्रेक का घेतला याविषयी सांगितले आहे.

फरदीन खान वैयक्तिक आयुष्याबद्दल काय म्हणाला?

फरदीन खानने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, 'आम्हाला मुल हवे होते. त्यावेळी आम्ही खूप प्रयत्न करूनही मुल होत नव्हते. शेवटी आम्ही लंडनला गेलो. तिथे आम्हाला एक खूप चांगला डॉक्टर भेटला, त्यानंतर २०१३मध्ये आयव्हीएफच्या माध्यमातून आमच्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर २०१७मध्ये आम्हाला दुसरा मुलगा झाला.'

मुलांसोबत वेळ घालवला

फरदीन खानने या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, मुलीच्या जन्मानंतर त्याला केवळ दोन वर्षांचा ब्रेक घ्यायचा होता. मात्र, तो ब्रेक पुढे लांबतच गेला. त्याला दोन्ही मुलांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्यायचा होता. "काश, मी कामातून एवढा मोठा ब्रेक घेतला नसता. एकच चांगली गोष्ट म्हणजे मला दोन सुंदर मुले आहेत ज्यांच्याबरोबर मी खूप वेळ घालवू शकतो" असे फरदीन म्हणाला. पुढे तो म्हणाला की, ब्रेकनंतर कामावर परतणे हा एक संघर्ष होता. कारण त्याने वयाची ५० शी ओलांडली होती.
वाचा: तू हॉटेलमध्येच गाणे गा; अरिजीत सिंहची नक्कल करणाऱ्या स्पर्धकावर संतापला विशाल दादलानी

फरदीनच्या कामाविषयी

नुकताच फरदीन खान अक्षय कुमारसोबत खेल-खेल या चित्रपटातही दिसला होता. फरदीनच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली तरी आता हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे. यावर्षी फरदीन खानने 'हीरामंडी' या संजय लीला भन्साळी यांच्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. त्याची या सीरिजमधील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. संजय गुप्ता यांच्या 'ब्लास्ट' या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.

Whats_app_banner