Farah Khan Mother Death:कोरिओग्राफर-दिग्दर्शक फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई मेनका इराणी यांचे आज (२६ जुलै) मुंबईत निधन झाले. मेनका इराणी या ७९ वर्षांच्या होत्या. अभिनेत्री डेझी इराणी आणि हनी इराणी यांची बहीण असलेल्या मेनका यांनी चित्रपट निर्माता कामरानशी लग्न केले होते. मीडिया रिपोर्टनुसार, मेनका काही दिवसांपासून आजारी होत्या.फराह खान आणि साजिद खानची आई मेनका इराणी यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण बॉलिवूड शोककळा पसरली आहे. फराहने दोन आठवड्यांपूर्वीच आई मेनका यांचा ७९वा वाढदिवस साजरा केला होता. आईच्या या खास दिवशी तिने एक अतिशय भावनिक पोस्टही शेअर केली होती, जी आता व्हायरल होत आहे.
१९६३मध्ये रिलीज झालेल्या'बचपन' चित्रपटात त्यांनी काम केले होते. हा चित्रपट सलीम खान यांनी लिहिला होता.मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काहीदिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. फराहने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक बर्थडे पोस्ट टाकली होती. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हाच फराहने म्हटले होते की, तिच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी फराह खानने तिच्या आईसोबतचे दोन सुंदर फोटो शेअर केले होते आणि तिच्या नावाने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. आईच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही पोस्ट केली आहे. तिने इंस्टाग्रामवर लिहिले होते की, 'आपण सर्वजण आपल्या आईला गृहीत धरतो... विशेषतः मी! माझी आई मेनकावर माझे किती प्रेम आहे, हे गेल्या महिन्यात मला समजले.. ती सर्वात मजबूत आणि धाडसी व्यक्ती आहे.. शस्त्रक्रियेनंतरही तिची विनोदबुद्धी कायम आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! घरी परतण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मी वाट पाहत आहे की, तू पुन्हा मजबूत होशील आणि माझ्याशी भांडशील.. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.’
फराह खानने अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’, ‘तीस मार खान’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांचे दिग्दर्शन तिने केले आहे. तिने बॉलिवूड किंग शाहरुख खानसोबत तीन चित्रपट केले आहेत. फराहने तिच्या करिअरची सुरुवात डान्स कोरियोग्राफर म्हणून केली होती.
संबंधित बातम्या