Farah Khan: एकेकाळी अडगळीच्या खोलीत राहणारी फराह आज आहे प्रसिद्ध कॉरिओग्राफर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Farah Khan: एकेकाळी अडगळीच्या खोलीत राहणारी फराह आज आहे प्रसिद्ध कॉरिओग्राफर

Farah Khan: एकेकाळी अडगळीच्या खोलीत राहणारी फराह आज आहे प्रसिद्ध कॉरिओग्राफर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 09, 2024 08:05 AM IST

Farah Khan Birthday Special: लहान असताना फराहच्या घरची परिस्थिती बिकिट होती. आज तिच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे...

Farah Khan
Farah Khan

आपल्या तालावर प्रत्येक बॉलिवूड कलाकाराला ठेका धरायला लावणारी नृत्यदिग्दर्शिका म्हणजे फराह खान. तिने आतापर्यंत २०० हून अधिक गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका म्हणून ओळखली जाते. पण फराहचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. तिला हालाखीचे दिवस काढावे लागले होते. आज फराहचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

फराहचा जन्म ९ जानेवारी १९६५ साली झाला. फराह लहान असताना तिचे वडील हे बी-ग्रेड चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. या काळात त्यांनी ऐसा भी होता है या ए-ग्रेड चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. त्यानंतर फरहाच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर झाला आणि येथूनच त्यांच्या संघर्षाचे दिवस सुरु झाले.
वाचा: 'देश सर्वात पहिला', पूनम पांडेने केले मालदीवमधील शूट रद्द

फरहाने स्वत: एका मुलाखतीमध्ये आयुष्यातील संघर्षाविषयी वक्तव्य केले होते. “वयाच्या ५ वर्षांपर्यंत माझं बालपण खूप छान गेले. माझे वडील दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता होते. पण, ते बी-ग्रेट सिनेमांचे. त्यांनी एक ए-ग्रेड चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आणि तो फ्लॉप झाला. त्यानंतर रातोरात आमचे आयुष्य बदलून गेले. या घटनेनंतर जवळपास १५ वर्ष आम्ही स्ट्रगल केला” असे फराह म्हणाली होती.

पुढे ती म्हणाली, “आम्ही अडगळीच्या खोलीमध्ये राहून दिवस काढले. पण आमच्याकडे सगळे सुरळीत सुरु आहे असेच मी कायम शाळेत दाखवायचे. याच काळात वडिलांचे आजारपणात निधन झाले आणि सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. मी चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करु लागले. कधी-कधी मी कलाकारांनादेखील काही डान्स स्टेप्सही शिकवल्या.बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत असतानाचा १९९३ मध्ये जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफी सरोज खान यांनी मध्येच बंद केली. त्यानंतर मला पहला नशा हे गाणे कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली. हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले. त्यानंतर शाहरुख खानच्या चित्रपटातील कभी हा कभी ना हे गाणे करण्याची संधी मिळाली.”

आज फराह बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आहे. तिने सुपरस्टार शाहरुखची जवळपास सगळीच गाणी करिओग्राफ केली आहेत. तिच्या दिग्दर्शनाखाली ‘मैं हूं ना’ हा चित्रपट तयार करण्यात आला. त्यानंतर फराहने ‘ओम शांती ओम’, ‘हॅप्पी न्यू इअर’, ‘तीस मार खान’ सारखे चित्रपट केले आहेत.

Whats_app_banner