R Madhavan: आर माधवननं 3 Idiots साठी दिलेल्या ऑडिशनचा १४ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  R Madhavan: आर माधवननं 3 Idiots साठी दिलेल्या ऑडिशनचा १४ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

R Madhavan: आर माधवननं 3 Idiots साठी दिलेल्या ऑडिशनचा १४ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Feb 20, 2023 06:40 PM IST

3 Idiots Audition Video: १४ वर्षांपूर्वीचा आर माधवनचा चेहरा आणि अभिनय पाहून नेटकरी भारावले आहेत.

आर माधवन
आर माधवन (HT)

बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन बरीच वर्षे उलटली तरी प्रेक्षक ते आनंदाने पाहातात. मग ते टेलिव्हीनवर असो किंवा इंटरनेटवर चाहते ते नक्की पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ३ इडियट्स. हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. आता या चित्रपटाच्या ऑडिशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

राजकुमार हिरानी यांच्या थ्री इडियट्स चित्रपटात मिर खान, शर्मन जोशी, आर माधवन आणि करीना कपूर खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता जवळपास १४ वर्षांनंतर आर माधवनच्या ऑडिशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील आर माधवनचा चेहरा आणि अभिनय पाहून नेटकरी भारावले आहेत.
वाचा: शाहरुख खान आणि विराट कोहलीला मागे टाकत एमसी स्टॅनने रचला नवा इतिहास

विधू विनोद चोप्रा फिल्म्सच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आर माधवन त्याच्या व्यक्तिरेखेचा एक मोनोलॉग सादर करताना दिसत आहे. चित्रपटातील फरहान कुरेशी त्याच्या वडिलांना इंजिनिअरिंग ऐवजी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनण्याची इच्छा व्यक्त करतो हा सीन आर माधवन करताना दिसतोय.

थ्री इडियट्स या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. या चित्रपटातील मिलीमीटर आणि चतुर रामलिंगाम या पात्रांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले होते. आता या चित्रपटाच्या ऑडिशनचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

Whats_app_banner