मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बॉलिवूड किंग अन् खिलाडी एकसाथ! शाहरुख खान आणि अक्षय कुमारच्या ‘त्या’ फोटोवर चाहतेही झाले फिदा!

बॉलिवूड किंग अन् खिलाडी एकसाथ! शाहरुख खान आणि अक्षय कुमारच्या ‘त्या’ फोटोवर चाहतेही झाले फिदा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jun 10, 2024 08:17 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेता शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांना एकमेकांना मिठी मारताना पाहून चाहतेही खुश झाले आहेत.

बॉलिवूड किंग अन् खिलाडी एकसाथ!
बॉलिवूड किंग अन् खिलाडी एकसाथ! (ANI)

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या सलग तिसऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी ९ जून रोजी दिल्लीत बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी उसळली होती. रजनीकांत, शाहरुख खान, अक्षय कुमार, कंगना रनौत, अनुपम खेर, रजनीकांत, विक्रांत मेस्सी आणि चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी हे कलाकार राष्ट्रपती भवनात दिसले. पण, ज्या क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, तो म्हणजे अक्षय आणि शाहरुखने एकमेकांना दिलेल्या प्रेममय शुभेच्छा… 

ट्रेंडिंग न्यूज

'बॉलिवूडचा खिलाडी आणि बादशाह' दिसले एकत्र!

एएनआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये अक्षय आणि शाहरुख एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देताना दिसत आहेत. ते शेअर करत न्यूज पोर्टल एएनआयने लिहिले की, ‘दिल्ली | राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेले अभिनेता शाहरुख खान आणि अक्षय कुमार एकमेकांना शुभेच्छा देताना.’  

अक्षयने या सोहळ्यासाठी पेस्टल हूड फॉर्मल शर्ट आणि गडद ट्राऊझर परिधान केला होता, तर शाहरुख गडद सूटमध्ये, केस पोनीटेलमध्ये  बांधले होते आणि चष्म्यामध्ये दिसत होता. कलाकार तिथे ओळखीच्या प्रत्येकाला अभिवादन करताना, हस्तांदोलन करताना दिसले. या सोहळ्याला मुकेश आणि अनंत अंबानी यांच्यासोबत शाहरुख पोहोचला होता.

चाहत्यांची प्रतिक्रिया

अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांना एकमेकांना मिठी मारताना पाहून चाहते रोमांचित झाले आणि दोन्ही कलाकारांना एकाच फ्रेममध्ये पाहून उत्साही झाले. एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले की, "मोदीजींनी शाहरुख आणि अक्षयला एकत्र आणण्यास मदत केली'. तर दुसऱ्याने लिहिले की, ‘या वर्षातील सर्वोत्कृष्ट मिठी.’

राखी सावंतला बळजबरी चुंबन ते डॉक्टरला दिलेली थप्पड! गायकच नाही काँट्रोव्हर्सी किंग आहे मिका सिंह!

त्यानंतर 'खिलाडी' आणि ‘बादशाह’चे चाहते कमेंट करत होते की, 'बॉलिवूडचा खिलाडी आणि बादशाह एकत्र' आणि ‘वाह खिलाडी कुमारची पठानला भेट’. एकाने लिहिले की, 'बॉलिवूडचा खिलाडी आणि किंग एक साथ'. काही चाहत्यांनी तर त्यांना 'फेव्हरेट' म्हणत कमेंटही केल्या.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या फोरकोर्टमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील आठ हजारांहून अधिक पाहुणे उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४