Viral Video: चाहत्याचा सुपरहिट सिनेमा पाहताना झाला मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज समोर येताच खळबळ-fan dies due to heart attack while watching devara movie in theater ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: चाहत्याचा सुपरहिट सिनेमा पाहताना झाला मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज समोर येताच खळबळ

Viral Video: चाहत्याचा सुपरहिट सिनेमा पाहताना झाला मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज समोर येताच खळबळ

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 30, 2024 03:44 PM IST

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका चाहत्याचा चित्रपटगृहामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Viral Video
Viral Video

आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी किंवा त्याचा चित्रपट चित्रपटगृहामध्ये पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. कधी कधी हाऊसफूल असलेल्या शोचे तिकीट मिळवण्यासाठी देखील चाहते वाटेल ते करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटगृहामध्ये आपल्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट पाहायला गेलेल्या चाहत्याचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.

थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

अभिनेता ज्यूनियर एनटीआर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर स्टारर ‘देवरा’ सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी सध्या गर्दी केली आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या एका चाहत्याचा चित्रपटगृहामध्ये अचानक मृत्यू झाला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. तेव्हा नक्की काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

काय आहे प्रकरण?

सध्या दक्षिणेकडे ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवीचा ‘देवरा’ हा चित्रपट सुपरहिट होताना दिसत आहे. आंध्र प्रदेश येथील कडप्पा येथे देखील हा चित्रपट लावण्यात आला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. दरम्यान, मस्तान नावाच्या चाहत्याचा सिनेमा पाहत असताना मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मस्तानचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांची तपासणी सुरु

मस्तान चित्रपट सुरु असताना चित्रपटगृहात अचानक खाली कोसळला. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चित्रपटगृहात प्रेक्षक आणि पोलीस दिसत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. घटलेल्या घटनेनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे . सध्या सर्वत्र घडलेल्या घटनेची चर्चा सुरु आहे.
वाचा: पतौडी शाही पॅलेस बनणार म्यूझियम? सैफ अली खानने सांगितले सत्य, वाचा…

देवरा चित्रपटाविषयी

सध्या सगळीकडे देवरा चित्रपटाची चर्चा सुरु आहे. जान्हवी कपूर, सैफ अली खान आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटाने पहिल्याच दिवश १४० कोटी रुपयांची कमाई केली होती. देशात चित्रपटात ८२.५ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. रविवारी सिनेमाने ४० कोटी रुपयांची कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाने आतापर्यंत भारतात १६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता चाहत्याचा थिएटरमध्ये मृत्यू झाल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Whats_app_banner
विभाग