Fahadh Faasil Bollywood debut: 'पुष्पा २' या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील अभिनेता फहाद फासिलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फहाद फसिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी समोर आली आहे. पुष्पा २ मध्ये फहाद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. फहाद लवकरच नॅशनल क्रश, बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करणार आहे. या चित्रपटातून फहाद फसिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दुसरे कोणी नसून बॉलिवूडचे उत्तम दिग्दर्शक इम्तियाज अली करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
पीपिंग मूनच्या वृत्तानुसार, इम्तियाज अली चित्रपटाच्या स्क्रिप्टला अंतिम टच देत आहेत. हा चित्रपट २०२५ च्या पहिल्या तिमाहीत निर्मितीच्या टप्प्यावर जाईल. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच इम्तियाज अली या चित्रपटाची निर्मितीही करणार आहेत. इम्तियाज अली हा फहाद फासिलचा आवडता बॉलिवूड दिग्दर्शक असून फहाद या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. तसेच फहाद आणि तृप्तीला एकत्र पाहाण्यासाठी चाहते आतुर आहेत. ही जोडी आता मोठ्या पडद्यावर काय कमाल करणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटानंतर तृप्ती डिमरीला सोशल मीडियावर नॅशनल क्रश म्हटले गेले. या चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. तृप्ती डिमरी आणि फहादचा रोमान्स मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तृप्ती डिमरीबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या लैला-मजनू या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांचा भाऊ साजिद अली यांनी केले होते. आता ती इम्तियाज अली यांच्यासोबत काम करणार आहे.
वाचा: बॉलिवूडमधील 'हा' सिनेमा आहे छोटा राजनच्या जीवनावर आधारित? संजय दत्तने साकारली होती भूमिका
पुष्पा २ बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट आज ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन हिरोच्या भूमिकेत आहे. तर फहाद फासिल खलनायकाची भूमिका साकारत आहे. याशिवाय रश्मिका मंदाना या चित्रपटात झळकणार आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
संबंधित बातम्या