बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे उदित नारायण. उदित यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात आहे. ट्विटरवर काहींनी ट्वीट करत उदित नारायण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे देखील म्हटले. पण आता त्यांच्या मॅनेजरने यावर प्रतिक्रिया देत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा बातम्या खोट्या आहेत. उदित नारायण यांच्या मॅनेजरने याबाबत माहिती दिली आहे. 'या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. उदित नारायण यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना काही झालेले नाही' असे त्यांच्या मॅनेजरने म्हटले आहे.
वाचा : राजू श्रीवास्तव यांच्या पाठोपाठ आणखी एका कॉमेडियनचे निधन
ट्विटर सुरु असलेल्या अफवा पाहून मॅनेजरने उदित नारायण यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर या सगळ्या अफवा पाहून मॅनेजरने संताप व्यक्त केला आहे मात्र या अफवा कशा सुरु झाल्या याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या