बॉलिवूडमधील खान कुटुंबीय हे कायमच चर्चेत असते. सलमान खानचा भाऊ सोहेल खान देखील खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याने पत्नी सीमा सजदेहला घटस्फोट दिला. सीमासाठी हा घटस्फोट सर्वात वेदनादायी होता. पण सीमा आता आयुष्यात पुढे गेली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने खासगी आयुष्यावर वक्तव्य केले. तिने घटस्फोट घेतल्यानंतर ओढावलेल्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.
फॅब्युलस लाईव्ह्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्स या सीरिजमध्ये सीमा सजदेहने घटस्फोटाविषयी मुलगा निर्वाणला सांगितल्यावर काय घडले हे सांगितले. सीमाला तिचा मोठा मुलगा साथ देत असल्याचे तिने सांगितले. मात्र, सीमा ज्या व्यक्तीला डेट करत आहे, ती तिच्यापेक्षा मोठी आहे की लहान आहे, असा प्रश्न नक्कीच पडतो.
वेब सीरिजमध्ये सीमाने एका एपिसोडमध्ये मुलाला विचारले की, 'मी आयुष्यात पुढे गेले तर तू माझ्यावर रागावशील का?' त्यावर निर्वाण आपल्या आईला साथ देत म्हणतो, "नाही, अजिबात नाही. अर्थात एका वेळेनंतर तुम्हाला जोडीदाराची गरज भासू लागते. हे अगदी नॉर्मल आहे. त्यामुळे मला काहीच समस्या नाही." निर्वाण त्याच्या आईला विचारतो की त्याची आई ज्या व्यक्तीला डेट करत आहे ती त्याच्यापेक्षा मोठी आहे का? सीमा होकार देते तेव्हा निर्वाण म्हणतो, 'हो, ठीक आहे. १०० टक्के मला त्यात काहीच अडचण नाही. जर तू आनंदी असशील तर मी तुझ्या आनंदात सहभागी होईन. या धकाधकीच्या वातावरणात तुम्ही किती दिवस राहणार आहात..? हे माझ्यासाठी आणि योहान (भाऊ) साठी देखील खूप चांगले आहे.'
सीमाचा मुलगा निर्वाण आईच्या घटस्फोटावर पहिल्यांदा बोलला. तेव्हा सीमा म्हणाली की, जेव्हा ती वांद्रे सोडून वरळीला शिफ्ट झाली तेव्हा दोन्ही मुलांना खूप त्रास झाला होता. याविषयी बोलताना निर्वाण म्हणाला की, 'तुझा घटस्फोट जाहीरपणे झाला होता. त्याला (छोट्या भावाला) कदाचित घटस्फोट हा शब्दही माहित नसेल. तो सगळं शिकत होता. त्याला खूप धक्का बसला. तो आता बरा आहे. मी आता आनंदी आहे.'
वाचा: प्रसिद्ध अभिनेत्रीचा खासगी MMS लीक, १७ सेकंदांच्या व्हिडीओने माजली खळबळ
'फॅब्युलस लाईव्ह्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्स'च्या शेवटच्या एपिसोडमध्ये सीमा विक्रम आहुजाला डेट करत असल्याचा खुलासा केला आहे. १९९० मध्ये सोहेलसोबत लग्न करण्यापूर्वी तिचा विक्रमशी साखरपुडा झाला होता. पण तिने सोहेलला आपला जीवनसाथी म्हणून निवडले.
संबंधित बातम्या