Excitel या होम इंटरनेट स्टार्टअपने दक्षिणेतील बंगळुरू, हैदराबाद, मंगळूरु, गुंटूर आणि विजयवाडा या प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांना परवडणारी इंटरनेट योजना सादर केली आहे. या नवीन योजनेद्वारे प्रेक्षकांना विविध प्रकारच्या मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये ग्राहकांना जलद गतीच्या हाय-स्पीड इंटरनेटचीम मागणी पूर्ण होणार आहे.
वर्षभराच्या सबस्क्रिप्शनसाठी फक्त ५९९ रुपये प्रती महिना शुल्क आकारले जाणार आहे. सदर्न ओटीटी (Southern OTT) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्लॅनमध्ये अनेक प्रभावी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये ४०० Mbps वेगाचे जलद इंटरनेट पुरविले जाणार आहे. परिणामी वापरकर्त्याला अखंड ऑनलाइन अनुभव प्रदान होणार आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना १७ प्रीमियम ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्म आणि ३०० हून अधिक थेट टीव्ही चॅनेलची व्यापक निवड करता येणार आहे.
प्लॅन लॉन्चसमयी Excitel चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वरुण पसरिचा म्हणाले, ‘तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि या सभोवतालच्या प्रदेशातील वैविध्यपूर्ण भाषा आणि संस्कृतीला पूरक ठरणासाठी या ओटीटीची रचना करण्यात आली आहे. भारताच्या पहिल्या दक्षिण योजनेचे अनावरण करताना आम्हाला आनंद होत आहे. होम ब्रॉडबँड आणि केबल टीव्हीच्या बदलत्या लँडस्केपमुळे आम्ही नियंत्रित डीटीएच सबस्क्रिप्शन सेवा आणि महागड्या अॅड-ऑन्सपासून दूर जात आहोत.’
सदर्न ओटीटी प्लॅनच्या माध्यमातून वापरकर्ते केवळ एका साइन-ऑनसह तब्बल ५० हजारहून अधिक टायटल्स आणि मनोरंजनाच्या विविध शोचा आनंद घेऊ शकणार आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये केवळ OTT अॅप्सच्या सेवांव्यतिरिक्तदेखील कंपनी आणखी सेवांचा विस्तार करत आहे. या विस्तारामध्ये उत्तरेकडील प्रादेशिक अॅप्सचा देखील समावेश आहे. देशभरात असलेल्या आमच्या सब्सक्रायबर्ससाठी वैविध्यपूर्ण आणि प्रदेश-निहाय मनोरंजन सामग्री प्रदान करण्याबद्दल Excitel ची वचनबद्धता कायम आहे. सर्वदूर प्रेक्षकांपर्यंत समृद्ध मनोरंजन पोहोचवण्यासाठी एक्सिटेल समर्पित आहे.
संबंधित बातम्या