Esha Deol: दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा आणि भरतमध्ये निर्माण झाला होता दुरावा; ‘या’मुळे झाला घटस्फोट!-esha deol and bharat takhtani divorce real reason reveal by actress ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Esha Deol: दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा आणि भरतमध्ये निर्माण झाला होता दुरावा; ‘या’मुळे झाला घटस्फोट!

Esha Deol: दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा आणि भरतमध्ये निर्माण झाला होता दुरावा; ‘या’मुळे झाला घटस्फोट!

Feb 07, 2024 10:47 AM IST

Esha Deol And Bharat Takhtani Divorce:ईशा देओल हिने १२ वर्षांचा संसार मोडून पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेतला आहे.

Esha Deol And Bharat Takhtani Divorce
Esha Deol And Bharat Takhtani Divorce

Esha Deol And Bharat Takhtani Divorce:बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिने १२ वर्षांचा संसार मोडून पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, आता दोघांनीही या वृत्तांना दुजोरा देत आपण वेगेळे झालो आहोत, असे म्हटले आहे. या जोडीला राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. ईशा आणि भरतच्या घटस्फोटाच्या वृत्ताला नुकताच दुजोरा मिळाला. आता या दोघांच्या वेगळे होण्याचे खरे कारण समोर आले आहे. खुद्द ईशानेच एक मोठे गुपित उघड केले आहे. याबद्दल सांगताना ती म्हणाली की, आमच्यातील हा दुरावा खूप दिवसांपासून सुरू होता. पती भरत बराच काळ माझ्यापासून दूर राहत होता.

...म्हणूनच ईशा-भरत वेगळे झाले?

अभिनेत्रीईशा देओल आणि उद्योगपती भरत तख्तानी यांनी संयुक्त निवेदन जारी करून घटस्फोटाच्या वृत्ताला मंजुरी दिली आहे. या जोडीने ही धक्कादायक बातमी शेअर केल्यानंतर आता प्रत्येकजण त्यांच्या घटस्फोटाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधीही भरत आणि ईशा यांच्या नात्यात अनेक अडचणी आल्या होत्या. खुद्द ईशाने तिच्या ‘अम्मा मिया’ या पुस्तकात याबद्दल लिहिले होते.

Tharala Tar Mag 6th Feb: मिसेस सायली आय लव्ह यु! अखेर अर्जुन देणार आपल्या प्रेमाची कबुली

ईशा देओलने म्हटले की, दुसरी मुलगी अर्थात मिरायाच्या जन्मानंतर तिचे पती भरतकडे दुर्लक्ष होऊ लागले. तो ईशापासून दूर राहू लागला होता. तिच्या प्रत्येक गोष्टीवर त्याची चिडचिड व्हायची. ईशा आपल्याकडे लक्षच देत नाही, असे भरत याला वाटत होते. भरत तख्तानी हा सतत तक्रार करायचा की, ईशा आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी विसरायची. अगदी आपला शर्ट इस्त्री नाही, टूथब्रश नाही... एखादीबायको हे सगळे कसे विसरेल? असे तो सतत म्हणायचा.

ईशा देओल हिला स्वतःच्या नात्याबद्दल शंका येऊ लागली होती. ईशा देओल म्हणाली होती की, भरत हा एक असा व्यक्ती आहे, ज्याला जास्त काही नको आहे. पण, जर मी त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही, तर नक्कीच काहीतरी वाईट घडेल, असे वाटत होते. मात्र, यावर मी लगेच पाऊल उचलले. मग, आम्ही एकमेकांना वेळ देऊ लागलो. बाहेर फिरायला जाऊ लागलो. त्यामुळे हळूहळू सगळं सुरळीत झालं. पण, पुन्हा एकदा त्यांच्या नात्यात असा दुरावा आला की, तो ते कधीच कमी करू शकले नाहीत. अखेर त्यांनी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

विभाग