मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Eros Cinema : तब्बल ७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 'या' प्रसिद्ध थिएटरचे दार उघडले; सिनेमा पाहताना येणार वेगळीच मज्जा!

Eros Cinema : तब्बल ७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 'या' प्रसिद्ध थिएटरचे दार उघडले; सिनेमा पाहताना येणार वेगळीच मज्जा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 09, 2024 02:01 PM IST

Eros Cinema Turned Into IMAX : मरीन ड्राईव्हच्याजवळ महर्षी कर्वे रोड आणि जमशेदजी टाटा रोडच्या जंक्शनवर असलेला ‘इरॉस सिनेमा’ २०१७मध्ये कमी तिकीट विक्रीमुळे बंद झाला होता.

Eros Cinema Turned Into IMAX
Eros Cinema Turned Into IMAX

Eros Cinema Turned Into IMAX: मुंबई शहरातील सर्वात सुंदर सिनेमागृहांपैकी एक असलेल्या इरॉस सिनेमाला नवसंजीवनी मिळाली आहे. मुंबईतील इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूंपैकी एक असलेला इरॉस सिनेमा पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘इरॉस सिनेमा’ हॉलच्या ठिकाणी आता सुसज्ज आयमॅक्स सिनेमा सुरू झाला आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्या ‘तेरी बातो में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटाने नव्या आयमॅक्स सिनेमागृहाचा श्रीगणेशा होणार आहे.

मरीन ड्राईव्हच्याजवळ, चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर, महर्षी कर्वे रोड आणि जमशेदजी टाटा रोडच्या जंक्शनवर असलेला ‘इरॉस सिनेमा’ २०१७मध्ये कमी तिकीट विक्रीमुळे बंद झाला होता. तब्बल सात वर्षांनंतर आता हा सिनेमा हॉल पुन्हा सुरू झाला आहे. इरॉस सिनेमा हॉल आता त्याच्या या नवीन स्वरुपात अतिशय सुसज्ज झाला आहे. ३०० आसनांच्या आलिशान सिनेमा हॉलमध्ये याचे रुपांतर झाले आहे. इतकेच नाही तर, आता मुंबईतील सर्वात पॉश भागातील हे पहिले आयमॅक्स थिएटर देखील असणार आहे.

Arun Govil: टीव्हीचे ‘राम’ मोठ्या पडद्यावर बनले पंतप्रधान नरेंद्र मोदी! अभिनेत्याचा लूक पाहून व्हाल हैराण

१९३५ मध्ये पारशी व्यापारी शियावक्स कावसजी कंबाटा यांच्या मालिकेच्या या जागेवर वास्तुविशारद सोहराबजी भेदवार यांनी डिझाइन केलेल्या ‘इरॉस सिनेमा’चे नाव एका ग्रीक देवतेच्या नावावर ठेवण्यात आले होते. १० फेब्रुवारी १९३८ रोजी इरॉस सिनेमा हॉल लोकांसाठी खुला करण्यात आला होता. त्याची सुंदर डिझाइन आणि एकूणच लूक यामुळे हा सिनेमा हॉल खूपच प्रसिद्ध झाला होता. ‘इरॉस सिनेमा’ हॉलची ही इमारत मूळत: कंबाटा कुटुंबाच्या मालकीची होती. ही इमारत त्यांनी मेट्रो रियॅल्टीला ३० वर्षांसाठी भाड्याने दिली होती. आता या ऐतिहासिक वस्तूच्या डागडुजीनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना या आयकॉनिक थिएटरमध्ये चित्रपट बघता येणार आहेत.

या नव्या सिनेमा हॉलबद्दल बोलताना मेट्रो रियॅल्टीचे व्यवस्थापकीय भागीदार अक्षत गुप्ता यांनी म्हटले की, ‘हे काम खूप नाजूक कलाकुसरीचे होते. म्हणूनच त्यासाठी वेळ लागला. इरॉस प्रत्येकाच्या हृदयात आहे. प्रत्येकाच्या मनात त्याची एक खास प्रतिमा आहे. या सिंनेमा हॉलचा रेड कार्पेट इतिहास आणि आर्ट डेको राखून आम्हाला त्याची पुनर्बांधणी करायची होती. लिफ्टपासून पायऱ्यांपर्यंत, रेलिंगपासून ते जिन्यांपर्यंत सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला गेला आहे. इरॉसच्या मूळ प्रतिमेला धक्का न देता हे काम करण्यात आले आहे.

WhatsApp channel

विभाग