बॉलिवूडचा 'सिरीअल किसर' अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे इम्रान हाश्मी. त्याने करिअरच्या सुरुवातीला बॉलिवूड चित्रपटांमध्ये किसिंग सीनचा सापाटा लावला होता. त्याच्या या भूमिकांमुळे त्याला एक वेगळीच ओळख मिळाली. पण गेल्या काही वर्षांपासून इम्रान त्याची ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. आज २४ मार्च रोजी इम्रान हाश्मीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
इम्रान हाश्मी हा त्याच्या किसिंग आणि बोल्ड सीनसाठी कायमच चर्चेत राहिला आहे. त्याचे काही अभिनेत्रींसोबतचे सीन तर तुफान गाजले होते. पण एकदा इम्रानने अभिनेत्री आलिया भट्टसोबत किसिंग सीन देण्यास नकार दिला होता. हो तुम्ही एकदम बरोबरा ऐकले आहे. या सगळ्याला आलियाचे वडील महेश भट्ट हे कारणीभूत असल्याचे समोर आले होते.
वाचा: सिद्धार्थ जाधवचं नशीब फळफळलं, 'या' हॉलिवूड सिनेमात साकारणार भूमिका
इम्रान हाश्मी आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची चांगली मैत्री झाली होती. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये इम्रानने भूमिका साकारली होती. खरं तर महेश भट्ट यांच्या चित्रपटातूनच इम्रान हाश्मीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यामुळे इम्रान हा महेश भट्ट यांचा कायमच आदर करत आला आहे. तो आलियाला बहिणीसारखे मानतो. या कारणामुळे जेव्हा त्याला आलियासोबत किसिंग सीन आहे हे कळाले तेव्हा त्याने थेट नकार दिला. 'आलियाला बहीण मानत असल्यामुळे तिच्यासोबत किसिंग सीन देणे योग्य नाही' असे इम्रान म्हणाला होता. त्याचा नकार दिग्दर्शकाला पचला नाही.
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियात साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ
इम्रानने चित्रपटात भूमिका साकारताना त्याची नाती प्रचंड जपली आहेत. त्याने आलियासोबत ज्या प्रकारे किसिंग सीन देण्यास नकार दिला होता. त्याच प्रमाणे त्याने जरीन खानसोबत बोल्ड आणि किसिंग सीन देण्यास नकार दिला होता. जरीन आणि इम्रान हे खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. इम्रानच्या या यादीमध्ये अभिनेत्री कंगना रणौत देखील आहे. कंगना सतत वादग्रस्त विधान करत असल्यामुळे आणि कलाकारांवर ताशेरे ओढत असल्यामुळे इम्राने तिच्यासोबत सीन देण्यासही नकार दिला होता. अनेकदा त्या दोघांमधील वाद टोकाला गेले आहेत.
इम्रानने गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटांमधून त्याच्या अभिनयाची दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर आली. नुकतीच इम्रानची शो टाइम ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळात आहे.