
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील कलाकार हे घराणेशाही आणि कास्टिंगवरुन अनेकदा एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसतात. आता यावरच आधारित एक बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'शो टाइम' असे आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
'शो टाइम' चित्रपटाच्या टीझरमध्ये इम्रान हाश्मी हा निर्माता दाखवला आहे. तो विक्ट्री स्टुडिओचा मालक आहे. त्याच्या लव्ह लाइफ अँगलमध्ये मौनी रॉयची एण्ट्री होते. दुसरीकडे राजीव खंडेलवाल, अरमान सिंह हे कलाकार दिसत आहेत. कोणत्या तरी कारणामुळे अरमानला सतत विरोध होत असतो. श्रिया सरन अरमानची प्रेमिका दाखवण्यात आली आहे. या सगळ्यात विजय राज आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका लक्षवेधी ठरत आहेत. या चित्रपटातील 'नेपोटिझम के मुखौटे के पिछे आखिरकार हर आउटसायडर, इनसायडर बनना चाहता है', 'सिनेमा धंदा नही, धर्म हे सड्डा' हे डायलॉग हिट होताना दिसत आहेत.
वाचा: आरोही-यशच्या लग्नाला कांचन आजीचा नकार, काय असणार यशचा निर्णय?
'शो टाइम' हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नसिरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी, मौनी रॉय, महिमा मकवाना, राजीव खंडेलवार, श्रिया सरन, विजय राज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मिहिर देसाई आणि अर्चित कुमार यांनी केले आहे. चित्रपटाचा टीझर पाहाता सध्या सर्वत्र चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संबंधित बातम्या
