Emraan Hashmi talked about Kissing Scene: बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे इमरान हाश्मी. त्याने अनेक चित्रपटांमध्ये किसिंग आणि रोमँटिक सीन्स दिले आहेत. त्यामुळे तो आज सीरियल किसर म्हणून ओळखला जातो. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरान याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. चित्रपटांमधील बोल्ड दृश्ये कमी केली तरी काही निर्मात्यांनी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असे तो म्हणाला. इमरानने किसिंग देणे का बंद केले या मागचे कारण देखील सांगितले आहे.
इमरानने नुकताच बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने किसिंग सीन बंद का केले याचा खुलासा केला आहे. “हे माझ्या पत्नीचे मत होते आणि ते ऐकायचे मी ठरवले होते. मी माझ्या कोणत्याच चित्रपटांमध्ये किसिंग सीन्सचा समावेश केला नाही. किंबहुना मला सुरुवातीपासूनच असे सीन्स करायचे नव्हते. पण माझी एक प्रतिमा बनवली गेली आणि त्याचा अनेक निर्मात्यांनी फायदा उचलला. प्रेक्षकांना खुश करणे हीच मुख्य गोष्ट बनत गेली. जेव्हा मी माझे चित्रपट पाहतो, तेव्हा मला प्रामाणिकपणे असे वाटते की काही ठिकाणी तशा सीन्सची गरजही नव्हती. चित्रपटासाठी ती मुख्य गोष्ट ठरली आणि मला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या” असे इमरान म्हणाला.
वाचा: ‘महाराष्ट्राची हास्याजत्रा’मधून सई ताम्हणकरही झाली गायब! अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण
तसेच किसिंग सीन पाहून पत्नीच्या मनात असुरक्षित भावना निर्माण होते असे देखील इमरान म्हणाला. तसेच तिने शोटाइम हा चित्रपट पाहिला का असा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. “अर्थातच तिच्या मनात असुरक्षिततेची भावना होती. पण आता नाहीये कारण आता मी तसे सीन्स करतच नाही. माझ्या पत्नीने अद्याप तो शो पाहिला नाही. त्यामुळे तो पाहिल्यानंतर तिच्या मनाता असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते (हसतो)” असे इमरान म्हणाला.
इमरान हाश्मीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी त्याचा टायगर ३ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्याची भूमिका विशेष चर्चेत होती. तसेच अक्षयसोबत त्याचा सेल्फी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच त्याची शोटाइम ही सीरिज देखील प्रदर्शित झाली होती.