लॉस एंजेलिसमध्ये रविवारी एमी पुरस्कार सोहळा पार पडला. ‘एमी पुरस्कार’ हा टीव्ही विश्वातील अतिशय प्रतिष्ठित पुरस्कार असून, यावेळी कॉमेडी सीरिजमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार क्विंटा ब्रन्सन (अॅबॉट एलिमेंटरी) यांना देण्यात आला आहे. तर, क्रिस्टोफरने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेते आणि लेखकांच्या संपामुळे जानेवारी महिन्यात पार पडणारा एमी पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. रविवार अखेर या पुरस्कार सोहळ्याचे वितरण झाले. चला पाहूया विजेत्यांची यादी...
सर्वोत्कृष्ट टॉक शो - द डेली शो
कॉमेडी सीरीज सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- एबन मॉस-बचराच
ड्रामा सीरीज सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- बिली क्रुडुप
कॉमेडी सीरीज सर्वोत्कृष्ट अभिनेता- जेरेमी एलन व्हाइट
कॉमेडी सीरीज सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- लिजा कोलोन-जायस
ड्रामा सीरीज सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- एलिजाबेथ डेबिकी
कॉमेडी सीरीज सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- जीन स्मार्ट
सर्वोत्कृष्ट रिअॅलिटी कॉमेडी कार्यक्रम- द ट्रेटर्स
सर्वोत्कृष्ट स्क्रिप्टेड व्हरायटी सीरीज- लास्ट वीक टुनाइट विद जॉन ओलिवर
सर्वोत्कृष्ट लेखक- अॅलेक्स एडेलमॅन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- स्टीवन जिलियन
कॉमेडी सीरीज सर्वोत्कृष्ट लेखक- लूसिया एनीलो
सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री- जेनिफर एनिस्टन, द मॉर्निंग शो
ड्रामा सीरिजमधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
क्रिस्टीन बारान्स्की, द गिल्डेड एज
निकोल बेहरी, द मॉर्निंग शो
एलिझाबेथ डेबिकी, द क्राउन - विनर
ग्रेटा ली, द मॉर्निंग शो
लेस्ली मॅनव्हिल, द क्राउन
करेन पिटमॅन, द मॉर्निंग शो
हॉलंड टेलर, द मॉर्निंग शो हॉलंड टेलर, द मॉर्निंग शो
एमी अवॉर्ड हा टेलिव्हिजन आणि मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना दिला जाणारा सर्वात प्रसिद्ध पुरस्कार आहे. हा पुरस्कार चित्रपटांना दिला जात नाही. तर, टेलिव्हिजन आणि माध्यम क्षेत्रासाठी दिला जातो.
वाचा: निकसोबत रोमँटिक झाली प्रियांका, बिकिनी फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा
गेल्या वर्षी एमी पुरस्कारासाठी दोन बॉलिवूडमधील कलाकारांची नावे देखील होती. निर्माती एकता कपूरला प्रतिष्ठित इंटरनॅशनल डायरेक्टरेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर वीर दासला त्याचा नेटफ्लिक्स स्पेशल शो ‘वीर दास: लँडिंग’साठी बेस्ट कॉमेडी पुरस्कार मिळाला होता.