मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Emmy Awards 2024: ‘एमी पुरस्कार २०२४’मध्ये कुणी मारली बाजी? पाहा यंदाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी...

Emmy Awards 2024: ‘एमी पुरस्कार २०२४’मध्ये कुणी मारली बाजी? पाहा यंदाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 16, 2024 09:42 AM IST

Emmy Awards 2024 Winner List: ‘एमी पुरस्कार २०२४’चे आयोजन अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे करण्यात आले होते.

Emmy Awards 2024 Winner List
Emmy Awards 2024 Winner List

Emmy Awards 2024 Winner List: अभिनेते आणि लेखकांच्या संपामुळे गतवर्षी पुढे ढकलला गेलेला ७५ एमी पुरस्कार अखेर आज (१६ जानेवारी) पार पडला. ‘एमी पुरस्कार २०२४’चे आयोजन अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे करण्यात आले होते. ‘एमी पुरस्कार’ हा टीव्ही विश्वातील अतिशय प्रतिष्ठित पुरस्कार असून, यावेळी कॉमेडी सीरिजमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार क्विंटा ब्रन्सन (अ‍ॅबॉट एलिमेंटरी) यांना देण्यात आला आहे. तर, क्रिस्टोफरने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे.

‘एमी पुरस्कारा’ची नामांकन यादी गेल्या वर्षी म्हणजेच २०२३मध्येच जाहीर करण्यात आली होती. तर, हा सोहळा सप्टेंबर २०२३मध्ये होणार होता. परंतु, हॉलिवूडचे कलाकार आणि लेखक संपावर गेल्यामुळे हा पुरस्कार सोहळा रद्द करावा लागला होता. अखेर आज हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे. ७५व्या एमी पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. चला जाणून घेऊया यंदाच्या विजेत्यांची यादी...

७५व्या एमी पुरस्कार २०२४ विजेत्यांची यादी:

- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कॉमेडी सीरिज- क्विंटा ब्रन्सन (अ‍ॅबॉट एलिमेंटरी)

- सर्वोत्कृष्ट अभिनेता कॉमेडी सीरिज- जेरेमी अ‍ॅलन व्हाईट (द बिअर)

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता कॉमेडी सीरिज- एबोन मॉस-बक्रच (द बिअर)

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री कॉमेडी सीरिज- एयो अदेबिरी (द बिअर)

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ड्रामा सीरिज- जेनिफर कूलिज (द व्हाईट लोटस)

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ड्रामा सीरिज - मॅथ्यू मॅकफॅडियन (सक्सेशन)

- सर्वोत्कृष्ट स्क्रिप्टेड व्हरायटी सीरिज- लास्ट वीक टुनाइट विथ जॉन ओलिवर

- सर्वोत्कृष्ट टॉक सीरिज- द डेली शो विथ ट्रेवर नोआ

- सर्वोत्कृष्ट रियॅलिटी कॉम्पिटीशन शो- रुपॉल ड्रॅग रेस

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता लिमिटेड सीरिज- पॉल वॉल्टर हॉसर (ब्लॅकबर्ड)

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री लिमिटेड सीरिज- नीसी नॅश-बेट्स (डेहमर-मॉन्स्टर: द जेफरी डेहमर स्टोरीड)

- सर्वोत्कृष्ट अतिथी अभिनेता ड्रामा सीरिज- निक ऑफरमन (द लास्ट ऑफ अस)

- सर्वोत्कृष्ट अतिथी अभिनेत्री ड्रामा सीरिज- स्टॉर्म रीड (द लास्ट ऑफ अस)

- सर्वोत्कृष्ट अतिथी अभिनेत्री कॉमेडी सीरिज- ज्युडिथ लाइट (पोकर फेस)

- सर्वोत्कृष्ट अतिथी अभिनेता कॉमेडी सीरिज- सॅम रिचर्डसन (टेड लासो)

- सर्वोत्कृष्ट लेखन विनोदी सीरिज- द बिअर (क्रिस्टोफर स्टोरर)

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन कॉमेडी सीरिज- द बिअर (क्रिस्टोफर स्टोरर)

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन लिमिटेड सीरिज- बीफ (ली सुंग जिन)

WhatsApp channel

विभाग