Emergency Collection : कंगनाचा 'इमर्जन्सी' बॉक्स ऑफिसवर आपटला! पहिल्या दिवशीची कमाई फक्त...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Emergency Collection : कंगनाचा 'इमर्जन्सी' बॉक्स ऑफिसवर आपटला! पहिल्या दिवशीची कमाई फक्त...

Emergency Collection : कंगनाचा 'इमर्जन्सी' बॉक्स ऑफिसवर आपटला! पहिल्या दिवशीची कमाई फक्त...

Jan 18, 2025 09:36 AM IST

Emergency Box Office Collection : अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर संथ ओपनिंग केली आहे.

कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ची बॉक्स ऑफिसवर निराशा!
कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ची बॉक्स ऑफिसवर निराशा!

Emergency Box Office Collection Day 1 : अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट १७ जानेवारी म्हणजेच शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कंगना रणौतच्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ ओपनिंग झाली आहे. कंगना रणौतचा हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र, गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. कंगना रणौत या चित्रपटात भारताच्या सर्वात मजबूत पंतप्रधान मानल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. कंगना रणौतचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. कंगना रणौतच्या अभिनयाचं सोशल मीडियावर ही कौतुक होत आहे.

कंगनाच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली?

सॅकनिल्क दिलेल्या माहितीनुसार, कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास २.३५ कोटींची कमाई केली आहे. कंगना रणौत शेवट ‘तेजस’ या चित्रपटात दिसली होती. कंगनाचा हा चित्रपट २०२३मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला होता.

कंगनाच्या मागील ५ चित्रपटांची कमाई

मागील ५ चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस ओपनिंग रिपोर्टनुसार , ‘तेजस’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास १.२० कोटींची कमाई केली होती. ‘धाकड’ने पहिल्याच दिवशी ५५ लाखांची कमाई केली होती. ‘थलायवी’ने ३२ लाख, ‘पंगा’ने २.७० कोटी आणि ‘जजमेंटल है क्या’ने ४.५० कोटींची कमाई केली आहे.

ऑडिशनसाठी बाईकवरुन जाताना २३ वर्षीय अभिनेत्याचा मुंबईत अपघाती मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा

कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, भूमिका चावला आणि सतीश कौशिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कंगनाने या चित्रपटात अभिनयासोबतच या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. कंगना रणौतच्या या चित्रपटाला पंजाबमध्ये विरोध होत आहे.

काय आहे ‘इमर्जन्सी’चं कथानक?

चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचे झाले, तर देशात आणीबाणी लागू झाली तेव्हाच्या भारताची परिस्थिती कशी होती, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधी यांची हत्या आणि खलिस्तानी चळवळीबद्दलही या चित्रपटात सांगण्यात आले आहे.

साधारणपणे असे दिसून येते की, कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कोणताही छोटा-मोठा वाद निर्माण झाला,तर त्याचा फायदा चित्रपटाला होतो. मात्र, ‘इमर्जन्सी’चे कलेक्शन पाहता असे म्हणता येणार नाही. अगदी कमी पैशात या चित्रपटाची सुरूवात झाली आहे. परंतु, आठवड्याच्या शेवटी हा काहीतरी आश्चर्यकारक करेल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

Whats_app_banner