Elvish Yadav Viral Video: 'बिग बॉस ओटीटी २'चा विजेता एल्विश यादव सतत चर्चेत असतो. त्याचे हाणामारी करतानाचे व्हिडीओ सतत समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचे नाव ड्रग्ज प्रकरणी आले होते. त्यानंतर आता एल्विशचा एका रेस्टोरंटमध्ये भांडण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने समोरच्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा जयपूरमधील हाय प्रोफाइल रेस्टोरंटमधील आहे. या व्हिडीओमध्ये एल्विश यादव एका माणसाच्या कानाखाली लगावताना दिसत आहे. पण समोरची व्यक्ती नक्की कोण आहे? किंवा तिने असे नेमके का केले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. एल्विश यादव यांच्या पीआर टीमने या घडामोडीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
वाचा: ‘आई कुठे काय करते’मधील आरोहीचा होणारा खरा नवरा काय करतो?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एल्विश बोलताना दिसत आहे की 'मला हाणामारी, भांडण करण्याचा कोणताही शौक नाही . मला माझ्या कामाशी अर्थ आहे. ज्याला फोटो काढायचा आहे, त्यांच्यासोबत कोणतीही तक्रार न करता फोटो काढतो. माझ्यासोबत पोलीस, कमांडो आहेत. काही चुकीचे वागलो का हेच ते सांगतील असेही एल्विशने म्हटले. पण, जर मला कोणी आई-बहिणीवरून शिविगाळ केल्यास तर मी त्यांना सोडणार नाही, असेही एल्विशने म्हटले. मी अशा लोकांना तोंडाने उत्तर देत नाही.'
एल्विश हा अतिशय लोकप्रिय यूट्यूबर आहे. त्याचे लाखोंमध्ये सब्सक्रायबर आहेत. त्याने बिग बॉस ओटीटी २मध्ये सहभाग घेतला होता. तसेच या शोचा तो विजेता देखील झाला होता. या शोने त्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. एल्विश २५ वर्षांचा आहे. त्याने दिल्लीमधील हंसराज महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व १७ जून २०२३ रोजी सुरू झाले होते. पुनीत सुपरस्टार, पूजा भट्ट, मनीषा रानी, बेबिका धुर्वे, साइरस ब्रोचा, अभिषेक मल्हान, आलिया सिद्दीकी, फलक नाज, अविनाश सचदेव, जद हदीद, जिया शंकर, आकांक्षा पुरी आणि पलक पुरसवानी हे स्पर्धक 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये सहभागी झाले होते. या सगळ्यांना पाठी टाकत एल्विशने बिग बॉस ओटीटीच्या ट्रॉफीवर नाव कोरले.
संबंधित बातम्या