नाव चूम आणि कामं गंगुबाईची... रजत दलाल आणि एल्विशच्या अश्लील कमेंटमुळं नवा वाद
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नाव चूम आणि कामं गंगुबाईची... रजत दलाल आणि एल्विशच्या अश्लील कमेंटमुळं नवा वाद

नाव चूम आणि कामं गंगुबाईची... रजत दलाल आणि एल्विशच्या अश्लील कमेंटमुळं नवा वाद

Published Feb 07, 2025 04:34 PM IST

Racist Comment on Chum Darang : बिग बॉस १८ मधील स्पर्धक चूम दरांग हिच्याविषयी अश्लील कमेंट केल्यावरून एल्विश यादव व रजत दलाल अडचणीत आले आहेत.

नाव चूम आणि कामं गंगुबाईची... रजत दलाल आणि एल्विशच्या अश्लिल कमेंटमुळं नवा वाद
नाव चूम आणि कामं गंगुबाईची... रजत दलाल आणि एल्विशच्या अश्लिल कमेंटमुळं नवा वाद

Racist Comment on Chum Darang : सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस १८ संपला असला तरी त्याविषयी चर्चा थांबता थांबत नाही. त्यातील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत आहेत. एका पॉडकास्टमुळं रजत दलाल आणि एल्विश यादव वादात अडकले आहेत. त्यांनी चूम दरांग हिच्या नावावरून अश्लील टिप्पणी केली आहे.

बिग बॉसचे स्पर्धक सध्या वेगवेगळ्या पॉडकास्टला मुलाखती देत आहेत. त्यात प्रत्येकजण कुटुंबातील सदस्यांबद्दलचा राग व्यक्त करताना दिसत आहे. नुकताच रजत दलाल बिग बॉस ओटीटी ३ विजेता एल्विश यादवच्या पॉडकास्टमध्ये दिसला. या पॉडकास्टमध्ये बोलताना रजत आणि एल्विशनं बिग बॉसमधील जवळपास सर्वच स्पर्धकांवर जोरदार टीका केली. रजत आणि एल्विश यांनी चुम दरांगच्या नावाची खिल्ली उडवली आणि तिच्यावर अश्लील टिप्पणीही केली. यानंतर सोशल मीडियात दोघांवर टीकेची झोड उठली आहे.

चुम नाव आणि काम 'गंगुबाई'...

दोघांच्या पॉडकास्टचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एल्विश म्हणतो, 'भाऊ, हा करण वीर आहे ना, त्याला नक्कीच कोविड झाला असावा. कारण तो चूमच्या भोवतीच घिरट्या घालायचा. चूम कोणाला आवडेल? इतकी वाईट टेस्ट कोणाची आहे? चूम या नावातच अश्लीलता आहे. तिचं नाव चूम आणि काम 'गंगूबाई' सारखं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा भाग त्याच्या चॅनलवरून काढून टाकण्यात आला आहे, मात्र क्लिप डिलीट होईपर्यंत ती व्हायरल झाली आणि नेटिझन्स त्यावरून संताप व्यक्त करत आहेत.

अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांकडं कारवाईची मागणी

एल्विश आणि रजत दलाल यांच्या या व्हिडिओ क्लिपनं खळबळ उडवून दिली आहे. अनेक सोशल मीडिया चॅनेल आणि ईशान्येकडील कंटेंट निर्माते ऑफिसर्सना टॅग करून यावर कारवाईची मागणी करत आहेत. 

‘तुम्ही लोक सर्वात वाईट लोक आहात. तुम्ही अशा टिप्पण्या कशा करू शकता? तुम्ही इथं कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात? ईशान्येची प्रतिमा आणि नावाचा खुलेआम अपमान करणाऱ्या या यूट्यूबरवर कारवाई का केली जाऊ शकत नाही?,’ असं एका युजरनं अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करत लिहिलं आहे. इतरही अनेक युजर्सनी एल्विश व रजत दलालवर टीका केली आहे.

Ganesh Pandurang Kadam

TwittereMail

गणेश कदम २०२२ पासून हिंदुस्तान टाइम्स- मराठीमध्ये सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहे. गणेश गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सामना या दैनिकांमध्ये काम केले आहे. राजकीय वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक राजकीय सभा, आंदोलने व विधीमंडळाची अधिवेशने कव्हर केली आहेत. २०१२ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारिता सुरू केली. गणेशला राजकारण, अर्थकारणाबरोबरच साहित्य व संगीत विषयक घडामोडींची विशेष आवड आहे.

Whats_app_banner