मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Snake Poison Drug: सापाच्या विषाची नशा केल्या प्रकरणी एल्विश यादवची ३ तास चौकशी

Snake Poison Drug: सापाच्या विषाची नशा केल्या प्रकरणी एल्विश यादवची ३ तास चौकशी

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 08, 2023 01:05 PM IST

Elvish Yadav case: नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात यूट्यूबर एल्विश यादवविरोधात सापाच्या विषाची नशा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे.

Elvish Yadav case
Elvish Yadav case

Snake Poison at rave party : रेव्ह पार्टीत सापाचे विष पुरवण्याच्या आरोपाखाली यूट्यूबर एल्विश यादव याच्यासह ६ जणांविरोधात नोएडा पोलिसांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी काल रात्री एल्विश यादवची दिल्ली पोलिसांनी कसून चौकशी केली. पण एल्विशने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्ली पोलिसांनी एल्विशला चौकशीसाठी बोलावले होते. इतके दिवस त्याने चौकशीला येण्यास नकार दिला होता. काल रात्री अखेर त्याने पोलीस चौकशीसाठी हजेरी लावली. या चौकशीदरम्यान त्याने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणात माझा काही समावेश नाही असे स्पष्ट एल्विशने सांगितले आहे.
वाचा: केदारनाथमधील प्रतिबंधित क्षेत्रात उतरलं सारा अली खानचं हेलिकॉप्टर; वन विभागाकडून तात्काळ कारवाई

पोलिस उपायुक्त (डीसीपी) हरीश चंदर यांनी या प्रकणाबाबत बोलताना, "यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव सापाच्या विष प्रकरणाच्या संदर्भात रात्री उशिरा नोएडा पोलिसांसमोर हजर झाला. काल त्याची चौकशी करण्यात आली. आता पोलिसांनी त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे" असे म्हणाले. आता या प्रकरणी कोणती आणखी माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी मुली पुरवल्याप्रकरणी अटक केलेल्या ५ आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी एल्विश यादव या सगळ्याशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या लोकांकडे ९ साप आणि सापाचे विष सापडले आहे. त्यापैकी ५ कोब्रा आणि उर्वरित विविध प्रजातीचे साप आहेत. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून, त्यात एल्विश यादवचे नाव असल्याचे पोलिसांनी म्हटले होते.

कशी करतात सापाच्या विषाची नशा?

वैज्ञानिकदृष्ट्या सापाच्या विषाची नशा दारूच्या नशेसारखी नसते. मात्र नर्व्हस सिस्टमवर परिणाम जाणवल्याने नशेसारखे लक्षण शरीरात दिसू लागतात. यालाच नशा मानले जाते. ही स्थिती विषातील न्यूरोटॉक्सिन्स या द्रव्यामुळे होते. जे न्यूरोट्रांसमिशनवर परिणाम करते. म्हटले जाते की, याचा परिणाम ६ ते ७ दिवस टिकतो.

कसे घेतले जाते विष?

विषाची नशा करणारे आधी सापाला केमिकलचे इंजेक्शन करतात. त्यानंतर ते सापाकडून स्वत:च्या ओठांवर किंवा जिभेवर दंश करून घेतात. त्यानंतर विष न्यूरोटॉक्सिन्स नर्व्हस सिस्टमवर परिणाम करू लागतात आणि नर्व सिग्नलचे ट्रांसमिशन प्रभावित होतात. यामुळे स्नायूमध्ये अशक्तपणा तसेच अनेक मानसिक व शारीरिक परिणाम दिसून येतात.

कोणत्या सापांचा वापर नशेसाठी होतो?

२०१४ मध्ये नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार नशा करणारे नाजा (कोबरा), बंगारुस सेरुलियस (करैत) आणि ओफियोड्रिस व्हर्नालिस आदि सापांचा वापर करतात. इंडियन जर्नल ऑफ फिजियोलॉजी अँड फार्माकोलॉजीमध्ये २०२१ मध्ये प्रकाशित एका स्टडीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्पदंशाचे ६० टक्के प्रकरणे ड्राय असतात.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग