Elvish Yadav News: चौकशीत एल्विश यादव सहकार्य करेना! पोलिसांपासून मोठी माहिती लपवत असल्याचा संशय
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Elvish Yadav News: चौकशीत एल्विश यादव सहकार्य करेना! पोलिसांपासून मोठी माहिती लपवत असल्याचा संशय

Elvish Yadav News: चौकशीत एल्विश यादव सहकार्य करेना! पोलिसांपासून मोठी माहिती लपवत असल्याचा संशय

Published Mar 18, 2024 08:56 AM IST

Elvish Yadav Latest News: पार्टीत सापाचे विष पुरवल्या प्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विशला अटक केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत एल्विश सहकार्य करत नसल्याचे आता समोर आले आहे.

चौकशीत एल्विश यादव सहकार्य करेना
चौकशीत एल्विश यादव सहकार्य करेना

Elvish Yadav Latest News: रविवारी म्हणजेच १७ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवला पोलिसांनी अटक केली आहे. पार्टीत सापाचे विष पुरवल्या प्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विशला अटक केली आहे. गेल्या वर्षी या सापाच्या विषाचा अर्थात ड्रग्जच्या प्रकरणात युट्युबर एल्विश यादव याचे नाव समोर आले होते. त्याचवेळी, आता या प्रकरणात एल्विश यादव याला अटक करण्यात आली असून, स्थानिक न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत एल्विश सहकार्य करत नसल्याचे आता समोर आले आहे.

या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना नोएडाचे डीसीपी विद्या सागर मिश्रा म्हणाले की, रविवारी दुपारी एल्विश यादव याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्याने पोलिसांना अजिबात सहकार्य केले नाही. इतकेच नाही तर, एल्विश यादवने माहितीही लपवल्याचेही पोलिसांनी सांगितले. एल्विश यादवला वन्यजीव संरक्षण कायद्याशी संबंधित या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या चौकशीदरम्यान एल्विश यादव पोलिसांपासून काहीतरी मोठी माहिती लपवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Shashi Kapoor Birthday: शशी कपूर यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार! वाचा भन्नाट किस्सा...

वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत अटक

याबद्दल बोलताना पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी एल्विशला एनडीपीएस कायद्याच्या कलमांतर्गत न्यायालयात हजर करण्यात आले. वन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ अंतर्गत एल्विश यादव आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशीसाठी त्याला बोलावण्यात आले होते. आता या प्रकरणी एनडीपीएस कायद्याची कलमे वाढवून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सेक्टर ४९ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. या एफआयआरमध्ये एल्विशसह आणखी सहा जणांची नावे होती.

Ratna Pathak Birthday: ना सात फेरे, ना निकाहनामा...; ‘असं’ झालं होतं रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह यांचं लग्न!

तो मी नव्हेच!- एल्विश यादव

मात्र, त्यावेळी एल्विश यादव वगळता इतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. तर, नंतर त्यांना जामीन मिळाल्याने सध्या ते देखील बाहेर आहेत. आता या प्रकरणात एल्विशलाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी स्वतःची बाजू मांडताना एल्विशने म्हटलेले की, तो सापाचे विष पुरवल्या जाणाऱ्या त्या पार्टीत गेलाच नव्हता. पीएफए अध्यक्ष आणि भाजप नेत्या मनेका गांधी यांनी एल्विश यादव याच्यावर सापाचे विष बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप केला होता.

Whats_app_banner