'बिग बॉस ओटीटी २'चा विजेता एल्विश यादव हा कायमच चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एल्विशचा हा व्हिडीओ बेडरुममधील आहे. तसेच त्याच्या सोबत 'बिग बॉस ओटीटी ३'चा स्पर्धक लुकेश कटारिया दिसत आहे. दोघेही शर्टलेस असून एकाच बेडवर पडलेले दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.
'बॉस ओटीटी ३' स्पर्धक लवकेश कटारिया आणि एल्विश यादवची खूप चांगली मैत्री आहे. जेव्हा लवकेश शोमधून बाहेर पडला तेव्हा एल्विशने त्याला धीर देण्यासाठी सर्वप्रथम फोन केला होता. लवकेश बिग बॉसच्या घरात असतानाही एल्विश त्याच्या आई-वडिलांशी सतत बोलत होता आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला मतदान करण्याचे आवाहन प्रेक्षकांना करत होता. आता शो संपल्यानंतर त्या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एल्विश बेडवर शर्टलेस झोपून म्हणतो की, 'आम्ही स्वतःची एक टोळी बनवण्याचा विचार करत आहोत. समलिंगी असणे ही वाईट गोष्ट नाही. कधी कधी लोकांना वाटते की आपण इतर लोकांच्या विरुद्ध दिशेने जात आहोत. नाही भाऊ, आम्ही आता कुठे उघडपणे बोलत आहोत.'
एल्विश व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत झोपलेल्या लवकेशला दाखवतो. लवकेश त्याच्या फोनमध्ये पाहात असतो. त्यानंतर एल्विश त्याचे अंतरवस्त्र दाखवतो. तेवढ्यात लवकेश बोलतो की माझा तुझ्यावर जराही विश्वास नाही यार.. तू व्हिडीओ शूट करत असतोस. त्यावर एल्विश बोलतो की असे मी फक्त पाहात होतो. नाही तर असे व्हायचे की तू अंतरवस्त्र देखील घातले नाहीत हे कळायचे. त्यावर लवकेश लगेच त्याचे अतरवस्त्र दाखवतो.
वाचा: 'मला महाराष्ट्राचे राजकारण तुझ्यात दिसतंय', अंकिता वालावलकरचा छोट्या पुढारीला टोला
एल्विश यादव बिग बॉस ओटीटी २ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक होता. त्या सीझनमध्ये पहिल्यांदाच कोणी वाइल्ड कार्ड शोचा विजेता ठरला होता. एल्विशची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याचा व्लॉग पाहणाऱ्यांचा त्याला खूप पाठिंबा मिळाला. एल्विशचे इन्स्टाग्रामवर १६.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. लवकेशचा देखील सोशल मीडियावर चाहता वर्ग मोठा आहे. त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर ३ मिलियन फॉलोअर्स आहेत.