मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'सजनीला मतदानाला घेऊन जा'; मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने शेअर केले भन्नाट बॉलिवूड मीम!

'सजनीला मतदानाला घेऊन जा'; मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने शेअर केले भन्नाट बॉलिवूड मीम!

May 23, 2024 11:04 AM IST

लोकसभा निवडणूक २०२४चा सहावा टप्पा २५ मे रोजी पडणाऱ्या मतदानात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील मीम ट्रेंडचा वापर केला आहे.

'सजनीला मतदानाला घेऊन जा'; मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने शेअर केले भन्नाट बॉलिवूड मीम!
'सजनीला मतदानाला घेऊन जा'; मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने शेअर केले भन्नाट बॉलिवूड मीम! (X/Election Commission)

लोकसभा निवडणूक २०२४चा सहावा टप्पा २५ मे रोजी पडणाऱ्या मतदानात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील मीम ट्रेंडचा वापर केला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची हवा आहे. सगळीकडेच ‘लापता लेडीज’ची चर्चा आहे. या चित्रपटातील दीपक आणि फुलच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे आता याच चित्रपटातील एका सीनचा मीम बनवून लोकांना मदतानासाठी प्रोत्साहित केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'एक्स'वर अर्थात ट्वीटरवर नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये निवडणूक आयोगाने किरण राव यांच्या 'लापता लेडीज'मधील प्रमुख पात्रांचा फोटो शेअर केला आहे.

Narendra Modi : विरोधक सत्तेत आल्यास तुमची जनधन खाती बंद करतील, तुमच्या घरातले नळही घेऊन जातील - नरेंद्र मोदी

या पोस्टमध्ये ‘लापता लेडीजच्या एका सीनचा फोटो शेअर करण्यात आला आहे. पण, त्यात वेगवेगळे डायलॉग आहेत. प्रत्यक्ष दृश्यात मुख्य अभिनेता आपल्या पत्नीवरील प्रेमाची कबुली देण्यापूर्वी आपल्या पत्नीला इंग्रजीत ’आय लव्ह यु' बोलून दाखवताना दिसतो. मुख्य अभिनेता दीपक आपल्या पत्नीला फुल कुमारीला इंग्रजीत एक वाक्य बोलून दाखवतो याच दृशाचा उपयोग करून निवडणूक आयोगाने एक मीम तयार केले आहे. यात दीपक इंग्रजीत ‘आय लव्ह यु’ न म्हणता ‘लेट्स गो व्होट' असे म्हणतोय.

Pm Narendra Modi : काँग्रेसने आपल्या अध्यक्षांना बाथरूममध्ये बंद केले होते, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

लोकसभा निवडणूक २०२४चा सहावा टप्पा

'लोकसभा निवडणूक २०२४'चा सहावा टप्पा २५ मेपासून सुरू होत असून लोकसभा निवडणूक २०२४ संपण्याच्या मार्गावर असून शेवटचा टप्पा १ जून रोजी होणार आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण ५८ जागांसाठी शनिवारी, २५ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. बिहारमधील आठ, हरयाणातील दहा, जम्मू-काश्मीरमधील एक, झारखंडमधील चार आणि दिल्लीतील सात, ओडिशातील सहा, उत्तर प्रदेशातील चौदा आणि पश्चिम बंगालमधील आठ जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ सात टप्प्यात पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीचे पहिले पाच टप्पे १९ एप्रिलपासून सुरू झाले. सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यांत होत असून, पहिल्या पाच टप्प्यांत १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी मतदान झाले. सहावा टप्पा २५ मे रोजी, तर सातवा टप्पा १ जून रोजी होणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४