मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ekta Kapoor: 'एकता कपूरच्या अटकेची बातमी खोटी', वकिलांनी केला खुलासा

Ekta Kapoor: 'एकता कपूरच्या अटकेची बातमी खोटी', वकिलांनी केला खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 03, 2022 09:01 AM IST

Ekta Kapoor Arrest: काही दिवसांपूर्वी एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर विरोधात बेगूसराय न्यायालयाने अटकेचे वॉरंट जारी केल्याचे समोर आले

एकता कपूर
एकता कपूर (HT)

टीव्ही क्वीन म्हणून एकता कपूर ओळखली जाते. ती सतत तिच्या चित्रपट आणि मालिकांमुळे चर्चेत असते. पण काही दिवसांपूर्वी एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर विरोधात बेगूसराय न्यायालयाने अटकेचे वॉरंट जारी केल्याचे समोर आले. पण आता एकताच्या वकिलांनी मोठा खुलासा केला आहे.

एकता कपूरच्या वकिलांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. 'बिहारमधील बेगुसरा येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याचे म्हटले जात होते. तक्रार दाखल करणार्‍या व्यक्तीच्या वकिलाच्या कथित विधानांच्या आधारे तयार केलेले हे वृत्त लेख पूर्णपण खोटे आहे. कारण आम्हाला कोणतेही वॉरंट मिळालेले नाही' असे ते म्हणाले.
वाचा: ऐश्वर्याच्या 'पोन्नियिन सेलवन'ची दुसऱ्याच दिवशी दमदार कमाई

काय आहे प्रकरण?

एकता कपूरची 'ट्रिपल एक्स' ही सीरिज आली होती. या सीरिजमधील काही दृश्यांमध्ये सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप एकतावर होता. त्यामुळे बिहारमधील बेगूसराय येथे एकता विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

बरौनी पोलीस ठाण्यात सिमरिया आदर्श गाव येथे राहणारे शंभू कुमार यांनी एकता कपूर विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी बिहारच्या बेगुसरायमधील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राजीव कुमार यांनी केली. त्यांनी एकता कपूर आणि शोभा कपूर यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले जात आहे. शंभू कुमार हे स्वत: सैन्यात भरती होते. त्यामुळे 'ट्रिपल एक्स' सीरिजमधील जवानाच्या पत्नीचे दाखवण्यात आलेले सीन्स हे अनेकांच्या भावना दुखावणारे आहेत असा आरोप त्यांनी केला.

IPL_Entry_Point

विभाग