मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ek Villain Return: जॉन अब्राहम सोबतच्या इंटीमेट सीनवर दिशा पाटनी म्हणते, 'खरं तर

Ek Villain Return: जॉन अब्राहम सोबतच्या इंटीमेट सीनवर दिशा पाटनी म्हणते, 'खरं तर

Payal Shekhar Naik HT Marathi
Jul 26, 2022 08:00 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (disha patani intimate scene with john abraham) लवकरच 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Return)मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात दिशाने अत्यंत बोल्ड सीन दिले आहेत. जॉन सोबत केलेल्या या सीनवर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.

दिशा पाटनी
दिशा पाटनी

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम, दिशा पाटनी, अर्जुन कपूर आणि तारा सुतारीया सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स' (intimate scenes in ek villain returns)च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र ट्रेलरमधील कथेसोबतच आणखी एका गोष्टीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे चित्रपटातील बोल्ड सीन. चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींनी भरभरून बोल्ड सीन दिले आहेत. दिशाने देखील जॉन अब्राहम सोबत इंटीमेट सीन दिले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिशाने या सीनच्या चित्रीकरणाबद्दल खुलासा केला. हे सीन करताना तिला कोणत्या अडचणी आल्या हे सांगत तिने जॉनचे आभार देखील मानले. जॉनने आपल्याला खूप कंफर्टेबल केलं असंही ती म्हणाली.

प्रमोशन दरम्यान दिशाला विचारण्यात आलं, किती अवघड असतं एका मुलीसाठी असे सीन चित्रित करणं?' त्यावर उत्तर देत दिशा म्हणाली, 'मी कुणासोबत सीन करत होते? जॉन अब्राहम. ते सीन चित्रित करणं माझ्यासाठी फारसं अवघड गेलं नाही. मी पहिल्यांदाच यांच्यासोबत असे सीन चित्रित करत होती पण जॉनने आणि मोहित सरांनी माझी खूप काळजी घेतली. जेणेकरून मला अवघडलेपण येणार नाही. खरं सांगायचं तर माझी काहीच तक्रार नाहीये.' असं म्हणत तिने जॉनचं कौतुक केलं.

काय आहे चित्रपटाची कथा...

चित्रपटाबद्दल सांगायचं तर, 'एक व्हिलन रिटर्न्स' हा सस्पेन्सने भरलेला थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये प्रियकर कोण आणि खलनायक कोण हे समजून घेणं अवघड आहे. स्टारकास्टबद्दल बोलायचं तर या चित्रपटात चार स्टार्स पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करत आहेत. हा चित्रपट 29 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरीने केलं आहे.

IPL_Entry_Point