आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा 'एक डाव भुताचा' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात मकरंद यांच्यासोबत सिद्धार्थ जाधव आणि मयूरी देशमूख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. उद्या ४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी चाहत्यांसाठी चित्रपटासंबंधी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हा चित्रपट केवळ ९९ रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या कसा...
सगळीकडे सध्या चर्चेत असलेल्या आणि उद्या म्हणजेच ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या 'एक डाव भुताचा' हा चित्रपट अवघ्या ९९ रुपयांमध्ये केवळ पहिल्या दिवशी पाहण्याची अनोखी संधी रसिक प्रेक्षकांना चित्रपटाच्या मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळते.
मराठी इंडस्ट्रीमधील विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांना एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा 'एक डाव भुताचा' या चित्रपटातून पूर्ण होणार आहे. तसेच या दोघांसोबत मयूरी देशमुख दिसणार असल्यामुळे चाहत्यांसाठी हा सिनेमा म्हणजे पर्वणी ठरणार आहे. तसेच उद्या म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाची पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे तिकिट हे केवळ ९९ रुपये आहे. जर प्रेक्षकांना हा चित्रपट ९९ रुपयांमध्ये पाहायचा असेल तर पहिल्याच दिवशी पाहावा लागणार आहे. केवळ पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे तिकिट सर्वत्र ९९ रुपये आहे.
स्मशानात जन्म झाल्यानं सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची कथा "एक डाव भुताचा" या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या तरुणाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवनं निभावली आहे, तर मकरंद अनासपूरे भूताच्या भूमिकेत आहेत. माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्टीला प्रेमकहाणीचा तडकाही आहे. त्यामुळे मनोरंजक कथानक, सकस अभिनय असलेला हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
वाचा: तोंडाला रुमाल बांधलेल्या सूरजला हॉटेलमध्ये मिळत नव्हती एण्ट्री, रुमाल काढताच गर्दी जमली अन्...
चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या