मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या! अभिनेत्रीच्या घरावर ईडीची धाड
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या! अभिनेत्रीच्या घरावर ईडीची धाड

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या! अभिनेत्रीच्या घरावर ईडीची धाड

Nov 29, 2024 12:17 PM IST

Shilpa Shetty-Raj Kundra : पॉर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणी ईडीने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती-उद्योगपती राज कुंद्रा याच्या घरावर छापा टाकला आहे. ईडीने राज कुंद्राच्या घरावरच नाही, तर त्याच्या कार्यालयावरही छापे टाकले आहेत.

raj kundra
raj kundra

Shilpa Shetty-Raj Kundra ED Raid : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्या घरावर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडी या रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा यांच्या घरावरच नव्हे तर इतरही अनेकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. मोबाइल  अॅपच्या माध्यमातून अश्लील मजकूर तयार करणे आणि प्रसारित करणे या संदर्भात हा तपास करण्यात आला आहे. ईडीचा तपास मुंबई पोलिसांच्या २०२१च्या प्रकरणावर आधारित आहे.

गुन्हे शाखेने जुलै २०२१ मध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. राज कुंद्राने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. अटकेनंतर राज कुंद्रा याला ६३ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आणि जामीन मिळाल्यानंतर राज कुंद्राने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

Shilpa Shetty Workout : पन्नाशीच्या जवळ पोहोचलेली शिल्पा शेट्टी अजूनही दिसते कोवळी नार! काय आहे फिटनेस सिक्रेट?

ईडी राज कुंद्रापर्यंत कशी पोहोचली?

फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी मढ आयलंडमधील एका बंगल्यावर छापा टाकला होता. त्या बंगल्यात अडल्ट चित्रपटांचे चित्रीकरण झाल्याचे छाप्यात उघडकीस आले. पोलिसांनी बंगल्याची तपासणी केली असता, या चित्रपटांच्या निर्मिती मागे राज कुंद्राचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. काही महिन्यांपूर्वी ईडीने २००२च्या बिटकॉइन पॉन्झी स्कीम घोटाळ्याच्या तपासात शिल्पा शेट्टीचा जुहू फ्लॅट, राज कुंद्रा यांच्या नावे नोंदणीकृत बंगला, इक्विटी शेअर्स आणि ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टीला मालकी हक्क हस्तांतरित करण्यापूर्वी फ्लॅट घेण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केल्याचा दावा केला जात आहे. राज कुंद्रावर प्रौढ सामग्री प्रकरणात सहभाग असल्याचाही आरोप आहे. भारतीय दंड संहिता, महिलांचे असभ्य प्रतिनिधीत्व (प्रतिबंध) कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायदा यासह अनेक कायदेशीर तरतुदींखाली त्याच्यावर आरोप आहेत.

राज कुंद्रा 'हॉटशॉट' ॲपद्वारे ॲडल्ट व्हिडिओ स्ट्रीम करत होता, ज्याला अॅप्पल आणि गुगलने त्यांच्या संबंधित प्लेस्टोअरवरून काढून टाकले आहे. राजची कंपनी ही या ॲपद्वारे ब्रिटीश कंपनीला ॲडल्ट कंटेंट विकायची, जी सबस्क्रिप्शनवर आधारित होती. आयटी संचालक, रायन थॉर्प याने ॲपच्या ऑपरेशन्स आणि आर्थिक व्यवहारांचे निरीक्षण केले होते. राजने चौकशीदरम्यान सांगितले होते की, त्याने २०१९मध्ये 'हॉटशॉट्स' यूएस २५,००० डॉलर्समध्ये विकले होते आणि आर्म्स प्राइम मीडियाची स्थापना केली होती.

Whats_app_banner