Vijay Deverakonda : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा ED च्या रडारवर, ‘लायगर’च्या फंडिंगबाबत चौकशी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vijay Deverakonda : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा ED च्या रडारवर, ‘लायगर’च्या फंडिंगबाबत चौकशी

Vijay Deverakonda : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा ED च्या रडारवर, ‘लायगर’च्या फंडिंगबाबत चौकशी

Nov 30, 2022 07:21 PM IST

Vijay Deverakonda Inquiry : लायगर चित्रपटाच्या आर्थिक पुरवठ्याबाबत अभिनेता विजय देवरकोडा याची ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. अभिनेता हैदराबादमधील विभागीय कार्यालयात हजर झाला होता.

अभिनेता विजय देवरकोंडा
अभिनेता विजय देवरकोंडा

बॉलिवूड चित्रपट लायगर वरून अभिनेता विजय देवरकोंडा अडचणीत सापडला आहे. या चित्रपटाच्या फंडिंगबाबत विजय देवरकोंडाची ईडीने चौकशी केली. ईडीने कथितरित्या फेमा उल्लंघन प्रकरणात या दाक्षिणात्या अभिनेत्याची चौकशी केली.१७ नोव्हेंबर  रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चित्रपट दिग्दर्शक पुरी जगन्नाध आणि निर्माता बनी चार्मी कौर यांची दिवसभर चौकशी केली. त्यांच्याकडे यावर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या हिंदी-तेलुगु फिल्म  'लायगर' मधील गुंतवणुकीच्या स्रोताविषयी चौकशी केली. 

लोकप्रिय टॉलीवुड अभिनेता विजय देवराकोंडा बुधवारी प्रवर्तन निदेशालय (ईडी) समोर  फिल्म  'लायगर' साठी फडिंग सोर्सिंग संबंधित तपासाच्या प्रकरणात हजर झाला. अभिनेता हैदराबादमध्ये  एजन्सीच्या विभागीय कार्यालयात ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. 

ईडी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट एक्ट (फेमा) च्या उल्लंघन प्रकरणाचा तपास करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय देवराकोंडाकडे चित्रपटासाठी अर्थ पुरवठा, अमेरिकी बॉक्सर माइक टायसन सह अन्य अभिनेत्यांना दिलेले मानधन याविषयी चौकशी केली.

या चित्रपटात प्रसिद्ध बॉक्सर माइक टायसनही दिसला होता. हा चित्रपट १२५ कोटी रुपयांत तयार करण्यात आला होता. 

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे शूटिंग लास वेगासमध्ये झाले होते. दरम्यान बॉक्स-ऑफिसवर हा चित्रपट फार काही कमाल करू शकला नाही. या फिल्मच्या माध्यमातून विजय देवरकोंडाने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. 

Whats_app_banner