ED Questioned Karan-Nia: मनी लाँड्रींग प्रकरणात निया शर्मा, करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाची चौकशी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ED Questioned Karan-Nia: मनी लाँड्रींग प्रकरणात निया शर्मा, करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाची चौकशी

ED Questioned Karan-Nia: मनी लाँड्रींग प्रकरणात निया शर्मा, करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाची चौकशी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 04, 2024 12:11 PM IST

ED Questioned Karan-Nia: बॉलिवूड अभिनेता करण वाही आणि क्रिस्टल डीसूझा यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत.

ED Questioned: मनी लाँड्रींग
ED Questioned: मनी लाँड्रींग

अभिनेता करण वाही, अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डीसूझा हे कलाकार ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. मनी लाँड्रींग प्रकरणी या तीनही कलाकारांना ईडीने समन्स बजावले आहे. या प्रकरणात ईडीने करण आणि क्रिस्टल यांची 3 जुलै रोजी चौकशी देखील केली. याच प्रकरणात अभिनेत्री निया शर्मालाही याआधी समन्स बजावण्यात आले होते.

काय आहे नेमके प्रकरण?

अभिनेता करण वाही आणि अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा यांना आंतरराष्ट्रीय एजंटद्वारे अवैध ऑनलाइन विदेशी ट्रेडिंगशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले आहेत. आंतरराष्ट्रीय ब्रोकर octaFX ट्रेडिंग ॲपद्वारे भारतात अवैध ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणात आता त्यांची चौकशी करण्यात आली आहे. या ट्रेडिंगसाठी आरबीआयकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवून ईडीने तापस सुरु केला आहे.
वाचा : शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात का दाखल व्हावं लागलं?; त्यांनी स्वत:च दिली माहिती

करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाला मिळाली मोठी रक्कम

Octafx ऑनलाइन ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून भारतात आतापर्यंत ५०० कोटी रुपयांचा व्यापार करण्यात आला आहे. लोकांना कमी पैसे गुंतवून मोठा नफा मिळवून दिला जात होता. सोशल मीडियावर या अवैध ट्रेडिंग फॉरेक्स ॲपच्या प्रमोशनसाठी करण वाही आणि क्रिस्टल डिसूझा यांची निवड करण्यात आली होती. जेणेकरुन याकडे अधिकाधिक लोक आकर्षित होती. तसेच या प्रकरणात दोघांनाही मोठी रक्कम देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: हनीमूनला गेलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीरचे झाले भांडण, समोर आला व्हिडीओ

दोघांच्या कामाविषयी

'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेतून क्रिस्टल घराघरात पोहचली. याच मालिकेत तिच्यासोबत अभिनेत्री निया शर्मा आणि कुशल टंडन महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर क्रिस्टलने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका ही विशेष गाजली. तसेच करण वाहीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो दिल मिल गये आणि चन्ना मेरे यांसारख्या कार्यक्रमांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. सध्या तो रायसिंघानी vs रायसिंघानी या वेब सीरिजमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत या सीरिजमध्ये जेनिफर दिसत आहे.
वाचा: कधीकाळी दोन वेळचे अन्नही मिळत नसणाऱ्या भारती सिंहकडे आज आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती

Whats_app_banner