Ajay Devgan: 'सिंघम अगेन'च्या सेटवर झालेल्या अपघातात अजय देवगण गंभीर जखमी, आता कशी आहे प्रकृती?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ajay Devgan: 'सिंघम अगेन'च्या सेटवर झालेल्या अपघातात अजय देवगण गंभीर जखमी, आता कशी आहे प्रकृती?

Ajay Devgan: 'सिंघम अगेन'च्या सेटवर झालेल्या अपघातात अजय देवगण गंभीर जखमी, आता कशी आहे प्रकृती?

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 28, 2024 01:06 PM IST

Ajay Devgan: अजय देवगणने नुकत्याच हजेरी लावलेल्या एका 'सिंघम अगेन' सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी अपघात झाल्याचे सांगितले. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

Ajay Devgan
Ajay Devgan

'बिग बॉस १८'च्या वीकेंडला बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सुपरस्टार सलमान खानसोबत मिळून 'सिंघम अगेन' या मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. प्रमोशनदरम्यान शोचा होस्ट सलमान खानचं लक्ष अजय देवगणच्या नजरेकडे गेलं. सलमानने अजयला विचारले, "डोळ्यावर जी जखम झाली आहे ती कशामुळे झाली आहे? चित्रपटाच्या सेटवर झाली का?" त्यानंतर अजयने सिंघम अगेन चित्रपटाच्या सेटवर अपघात झाल्याची माहिती दिली.

अजयने सेटवर अपघात झाल्याची दिली माहिती

अजयने सिंघम अगेन चित्रपटाच्या सेटवर अपघात झाल्याची माहिती दिली. त्याने सांगितले की, 'सिंघम अगेन'च्या चित्रीकरणादरम्यान चुकीच्या वेळी अॅक्शन सीन्स केल्यामुळे त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे छोटीशा शस्त्रक्रिया करावी लागली होती. पण या शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन महिने तो पाहू शकला नाही. सलमानने त्यावर उत्तर देत म्हटले की, "जर तुम्ही अॅक्शन सीन्स करत असाल तर हे सगळं घडतच राहतं.'

त्यानंतर तिघांनी मिळून काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. अजय म्हणाला, 'आजकाल हे थोडं सोपं झालंय, आमच्या काळात आम्हाला कुठल्याही आधाराशिवाय चार-पाच मजल्यावरून उडी मारावी लागत होती. सलमान म्हणाला, 'आणि तुझे वडील अॅक्शन डायरेक्टर होते. मी अजयच्या वडिलांसोबत काम केले आहे. रात्रीचे चित्रीकरण ९.३० वाजेपर्यंतच होते, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. मला खूप मजा यायची.

यानंतर शिल्पा शिरोडकर आणि अजय देवगण यांनी सलमानला सांगितले की, दोघांनी एका चित्रपटात एकत्र काम केले होते, ज्याचे नाव सिंगर होते, पण तो चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. अजय देवगणच्या 'फूल और कांटे' नंतरचा हा दुसरा चित्रपट होता.

दोन चित्रपट आमने सामने

यापूर्वी 'सिंघम अगेन' हा चित्रपट १५ ऑगस्टरोजी प्रदर्शित होणार होता. पण त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले. त्यानंतर आता दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट धमाल उडवणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपटही दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. तरी निर्मात्यांनी हा चित्रपट ठरलेल्या वेळेत म्हणजेच १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वाचा: भाजपच्या 'या' माजी महिला खासदाराने साकारली होती अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका

प्रदर्शनापूर्वीच कमावले कोट्यवधी रुपये

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'सिंघम अगेन'चे सॅटेलाईट, डिजिटल आणि म्युझिक राइट्स २०० कोटीरुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकले गेले आहेत. अशापरिस्थितीत अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांची हा सर्वात मोठा नॉन थिएटर डील ठरला आहे.

Whats_app_banner