Dunki Worldwide Box Office Collection:बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा ‘डंकी’ हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिस गाजवत आहे. डिसेंबर महिन्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आहे.नवीन वर्षातही‘डंकी’ची जगभरातील कमाई सुरूच आहे. दरम्यान,‘डंकी’च्याजगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनचा नवा रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. शाहरुख खानचा‘डंकी’ हा चित्रपटआता एकूण कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकण्याची तयारी करत आहे.
शाहरुख खानचा चित्रपट‘डंकी’नेरिलीजच्या १३व्या दिवशी जगभरात कमाईच्या बाबतीत चांगला व्यवसाय केला आहे. मात्र,मागील काही दिवसांच्या तुलनेत आता या चित्रपटाच्या व्यवसायात थोडीशी घसरण दिसून येत आहे. पण,‘डंकी’ने आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर ४०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. रिलीजच्या १३व्या दिवशीपर्यंत एकूण ४०९ कोटींची कमाई करून ‘डंकी’ने शाहरुख चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.निर्मात्यांनी चित्रपटाच्या कमाईचे नवीन आकडे नुकतेच शेअर केले आहेत. शाहरुख खानच्या‘डंकी’ या चित्रपटाने १३ दिवसांत ४०९.८९ कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवला आहे.
या चित्रपटाने देशातील बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.शाहरुख खानच्या चित्रपट कारकिर्दीत आतापर्यंत असे फक्त तीन चित्रपट आहे, ज्यांनी देशाभरतील बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. यामध्ये २०२३मध्ये आलेला'जवान'चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने ६४३.८७ कोटी कमावले होते. दुसऱ्या स्थानावर २०२३मध्येच आलेला'पठान'चित्रपट आहे. या चित्रपटाने ५४३.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, तिसऱ्या स्थानावर २०१४चा'हॅपी न्यू इयर'चित्रपट होता. या चित्रपटाने २०३ कोटींची कमाई केली होती.
‘डंकी’या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून,या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटात अशा लोकांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना पैसे कमवण्यासाठी परदेशात जायचे आहे. ही कथा पंजाबमधून प्रेरित असून,राजकुमार हिराणी यांचा शाहरुखसोबतचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे.
संबंधित बातम्या