मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dunki Trailer: हार्डी आणि दोस्तांची धमाल दुनियादारी! 'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात?

Dunki Trailer: हार्डी आणि दोस्तांची धमाल दुनियादारी! 'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात?

Dec 05, 2023 12:48 PM IST

Dunki Trailer Out Now: 'डंकी ड्रॉप ४' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये पुन्हा एकदा शाहरुख खानचा दमदार अंदाज पाहायला मिळाला आहे.

Dunki Trailer Out Now
Dunki Trailer Out Now

Dunki Trailer Out Now: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या 'डंकी' या चित्रपटाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्याच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते. अखेर आता हा 'डंकी ड्रॉप ४' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये पुन्हा एकदा शाहरुख खानचा दमदार अंदाज पाहायला मिळाला आहे. 'पठान' आणि 'जवान'नंतर आता प्रेक्षकांना 'डंकी'कडून देखील मोठ्या अपेक्षा आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

राजकुमार हिरानी दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटात हार्डी आणि त्याच्या मित्रांच्या छोट्याशा जगाची रोलर कोस्टर राईड दाखवण्यात येणार आहे. राजकुमार हिरानी हे विनोदी आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कथा दाखवण्यासाठी ओळखले जातात. त्यांचा हाच अंदाज 'डंकी'मध्येही पाहायला मिळणार आहे. 'डंकी ड्रॉप ४'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरची सुरुवात होते शाहरुख खान ट्रेनमधून उतरल्यानंतर, जो स्वतःला आपल्या मित्रांसोबत लंडनला जाण्याची तयारी करत आहे.

KBC 15: स्पर्धकाला विचारला गेला 'जवान'शी संबंधित प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

'डंकी'च्या ट्रेलरची सुरुवात 'हार्डी' अर्थात शाहरुख खानपासून होते. तो पंजाबमधील एका सुंदर गावात पोहोचतो, जिथे त्याचे मित्र मनू, सुखी, बग्गू आणि बल्ली राहत आहेत. त्या सगळ्यांचे एक स्वप्न आहे. प्रत्येकाला लंडनला जाऊन तिकडे काम करून आपल्या कुटुंबियांना चांगलं आयुष्य द्यायचं आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण इंग्रजी शिकण्यासाठी धडपड करू लागतात. यासाठी त्यांना बोमन इराणी त्यांना प्रशिक्षण देतात. या ट्रेलरमध्ये अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शाहरुख आपल्या कॉमेडी स्टाईलमध्ये लोकांना हसवणार आहे. यात एक भावनिक अँगलही जोडला गेल्याचे दिसत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४