Dunki Promotional Event: बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान त्याच्या 'डंकी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कल्ला करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दरम्यान आता शाहरुख खान त्याच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. शाहरूख खानचा चित्रपट येतोय आणि त्याचं दुबईत प्रमोशन होणार नाही, असं होणं शक्यचं नाही. सध्या शाहरुख खान 'डंकी'च्या प्रमोशनसाठी दुबईत पोहोचला आहे. यावेळी दुबईत खास ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. या ड्रोन शोमध्ये शाहरुख खान याची सिग्नेचर स्टेप आकाशात झळकली.
शाहरुख खान याचा चित्रपट रिलीज व्हायच्या आधी शाहरुख खान नेहमी दुबईत प्रमोशन करताना दिसतो. यावेळीही शाहरुख खानचं दुबईत जल्लोषात स्वागत झालं. शाहरुखच्या स्वागतासाठी खास ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी आकाशात शाहरुख खान याची सिग्नेचर पोज ड्रोनच्या माध्यमातून बनवण्यात आली होती. तर शाहरुख खानचे नाव देखील यावेळी आकाशात झळकले. यावेळी बुर्ज खलिफावर 'डंकी'चा ट्रेलर देखील दाखवण्यात आला. या दरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
बॉलिवूड किंग शाहरुख खान सध्या दुबईमध्ये असून, या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि अभिजित जोशी हे देखील शाहरुखसोबत दुबईत आहेत. यावेळी शाहरुख खान काळ्या रंगाच्या टीशर्ट आणि डेनिमसोबत लाल रंगाच्या जॅकेटमध्ये दिसला होता. तर, आपली सिग्नेचर पोज आकाशात पाहून शाहरुख खान देखील हरखून गेला होता. चाहत्यांमध्ये देखील जल्लोष पाहायला मिळाला.
'डंकी' या आगामी बहुचर्चित चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विक्रम कोचर, विकी कौशल, अनिल ग्रोव्हर आणि बोमन इराणी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात चार मित्रांची कथा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरसह गाण्यांना देखील विशेष पसंती मिळाली आहे. आता चाहते आणि प्रेक्षक आतुरतेने 'डंकी' या चित्रपटाची वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या