मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'द्रौपदी राष्ट्रपती आहे तर...', राम गोपाल वर्मांचं वादग्रस्त वक्तव्य,भाजपची टीका

'द्रौपदी राष्ट्रपती आहे तर...', राम गोपाल वर्मांचं वादग्रस्त वक्तव्य,भाजपची टीका

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 25, 2022 08:50 AM IST

Ram gopal varma controversial statement : प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जाहीर केलेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर भाजप नेत्यानं गुन्हा दाखल केला आहे.

Ram gopal varma controversial statement
Ram gopal varma controversial statement (HT)

Ram gopal varma controversial statement on draupadi murmu : प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. त्यामुळं त्यांना अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. परंतु आता त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जाहीर केलेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राजकीय वादंग निर्माण झालं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'जर द्रौपदी राष्ट्रपती आहे तर पांडव कोण आहेत आणि यापेक्षा महत्त्वपूर्ण बाब ही आहे की पांडव कोण आहेत?', असं ट्विट वर्मा यांनी केल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली. त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. याशिवाय तेलंगानामधील भाजप नेते गुडूर नारायण रेड्डी यांनी वर्मा यांच्याविरोधात द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं म्हणून गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं आता वर्मा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

वर्मा यांच्यावर भाजप नेत्यानं गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर माफी मागताना एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की 'मी केलेल्या वक्तव्यामुळं मला कुणाला दुखवायचं नव्हतं, केवळ गंभीर विडंबना म्हणून मी ते वक्तव्य केलं होतं, महाभारतातील द्रौपदी हे माझ्या सर्वात आवडीचं पात्र आहे', असं वर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.

वर्मा हे नेहमीच राजकीय आणि सामाजिक विषयांवर त्यांचं वेगळंच मत मांडणारे दिग्दर्शक ओळखले जातात. याशिवाय त्यांनी विविध विषयांवरून भाजपवर अनेकदा सडकून टीका केलेली आहे. त्यामुळं आता त्यांच्या या वक्तव्यावरून देखील त्यांच्याविरोधात रोष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या