बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून विद्या बालन ओळखली जाते. तिचा प्रत्येक चित्रपट हा कायमच चर्चेचा विषय ठरत असतो. विद्याची फॅनफॉलोइंग देखील मोठी आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून विद्याच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर तिने आता प्रतिक्रिया दिली आहे.
विद्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती छोट्या पडद्यावरील मालिका अनुपमामधील डायलॉग बोलताना दिसत होती. ती ‘दो और दो प्यार’ असे बोलताना दिसत होती. तिच्या पोस्टवरुन प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आले. अनेकांनी विद्याला शुभेच्छा दिल्या. तर काहींनी तिला काळजी घेण्यास सांगितली. आता विद्या खरच प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: मिया खलिफाचे झाले इस्रायली महिलेशी भांडण, व्हिडीओ व्हायरल
विद्याने स्वत: याबाबत खुलासा केला. ‘दो और दो प्यार’ हा विद्याचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी तिने हा फंडा वापरला आहे. मात्र, हे ऐकून चाहत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता देखील पाहायला मिळते.
विद्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा काही दिवसांपूर्वी नियत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता तिचा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.