Doctor's Day 2024: डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात 'हे' हिंदी चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Doctor's Day 2024: डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात 'हे' हिंदी चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

Doctor's Day 2024: डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात 'हे' हिंदी चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 01, 2024 12:11 PM IST

Doctor's Day 2024: भारतात १ जुलै रोजी डॉक्टर दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने बॉलिवूडमधील डॉक्टरांवर आधारित चित्रपट कोणते चला पाहू...

Doctors Day movies: डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे चित्रपट
Doctors Day movies: डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे चित्रपट

भारतात १ जुलै हा दिवस डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य बजावत रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टकांना समर्पित केला जातो. त्यानिमित्ताने बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत ज्यामध्ये डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. चला जाणूम घेऊया या चित्रपटांविषयी...

'दुश्मन'

समाजात झालेले बदल हे अनेकदा कथेच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात अशा अनेक विषयांवर चित्रपट काढण्यात आले ज्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यामध्ये १९३९ साली प्रदर्शित झालेल्या 'दुश्मन' या चित्रपटाचा देखील सहभाग आहे. या चित्रपटात के. एल. सहगल, लीला देसाई, नजमुल हसन, पृथ्वीराज कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या सहगलला टीबी झालेला असतो. पण डॉक्टरांच्या मदतीने त्यावर मात केल्याचे दाखवण्यात आले आहे.
वाचा: 'जुनं फर्निचर' सिनेमा घरबसल्या पाहायचाय? मग ही बातमी नक्की वाचा

'डॉक्टर'

१९४१ मध्ये प्रदर्शित झालेला 'डॉक्टर' हा चित्रपट गाजला होता. या चित्रपटातील अमरनाथ हा गावातील महामारी दूर करताना गावकऱ्यांची सेवा करताना दिसतो. हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहेत.

डॉ. कोटनीस की अमर कहाणी

चीन आणि जपान युद्धा दरम्यान डॉक्टरांनी खूप महत्त्वाची भूमिका साकारली होती. युद्धात जखमी झालेल्या चीनी सैनिकांवर उपचार करण्यासाठी काही भारतीय डॉक्टरांना पाठवण्यात आले होते. त्यावर आधारीत १९४६मध्ये डॉ. कोटनीस की अमर कहाणी हा चित्रपट आला होता. या चित्रपटात कोकणात जन्माला आलेल्या डॉ. द्वारकानाथ कोटनीस यांची कथा दाखवण्यात आली आहे.
वाचा: तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणारी 'गूगल आई', पाहा उत्सुकता वाढवणारा टीझर

अनुराधा

अनुराधा हा चित्रपट डॉ. कोटनीस की अमर कहाणीच्या पुढचा भाग आहे. या चित्रपटात बलराज साहनी हे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करुन इतरांची सेवा कशी करतात हे दाखवण्यात आले आहे.
वाचा: अस्सल मातीतील कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार; 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

दिल अपना और प्रीत पराई

दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटात डॉक्टर आणि नर्स यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. समाजाशी भांडून ते दोघे लग्न करताना चित्रपटात पाहायला मिळते.

आरती

१९६२ साली प्रदर्शित झालेला आरती हा चित्रपट देखील एका डॉक्टरवर आधारित आहे. या चित्रपटात प्रकाश या पात्राच्या माध्यामातून आपल्या पेशाचा फायदा घेणाऱ्या डॉक्टरांची कथा दाखवण्यात आली आहे.

Whats_app_banner