मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Anant Ambani: अनंत अंबानीच्या हातातील घड्याळ पाहून मार्क झुकरबर्गची पत्नी थक्क, जाणून घ्या किंमत

Anant Ambani: अनंत अंबानीच्या हातातील घड्याळ पाहून मार्क झुकरबर्गची पत्नी थक्क, जाणून घ्या किंमत

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 04, 2024 01:24 PM IST

Anant Ambani expensive Watch: अनंत अंबानीच्या या घड्याळाची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. या घड्याळाच्या किंमतीमध्ये मुंबईत आलिशान घर खरेदी करता येईल.

Anant Ambani expensive Watch
Anant Ambani expensive Watch

Anant Ambani-Radhika Merchant pre wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. १ मार्च पासून त्याच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड, हॉलिवूड आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नीसुद्धा या कार्यक्रमाला हजर होती. दरम्यान सोशल मीडियावर अनंत आणि झुकरबर्गच्या पत्नीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती अनंतच्या हातातील घड्याळ पाहून थक्क झाली आहे.

‘फेसबुक’चे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा पत्नीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये झुकरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चान या अनंतच्या हातातील महागडं घड्याळ पाहून थक्क होताना दिसत आहेत.
वाचा: आलियाच्या कडेवरील राहाला पाहताच अनंत अंबानी झाला खूश, पाहा व्हिडीओ

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनंत हा झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिलासोबत उभे दिसत आहेत. तिघेही छान गप्पा मारताना दिसत आहेत. अनंत प्रिसिला यांना वनतारा फिरण्याविषयी विचारत असतो. तेवढ्यात प्रिसिली यांची नजर अनंतच्या घड्याळावर जाते. ते घड्याळ पाहून प्रिसिला चकीत होतात. त्या अनंतला विचारतात की, “हे अत्यंत कमालीचे घड्याळ आहे. कोणत्या कंपनीने हे घड्याळ बनवले आहे?” लगेच झुकरबर्ग अनंतला सांगतात की, प्रिसिलाला घड्याळांचा शौक नाही. पण तुमच्या हातातील घड्याळ त्यांना फार आवडले आहे. त्यावर प्रिसिला म्हणतात, “मला कधीच घड्याळ घ्यायचं नव्हतं. परंतु अनंत यांच्या हातातील घड्याळ पाहून माझं मतपरिवर्तन झालंय.” त्यानंतर काही वेळ यावर ते चर्चा करतात.
वाचा: 'अच्छा तो हम चलते हैं...', धर्मेंद्र यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत

अनंतच्या घड्याळाची किंमत किंती?

अनंतच्या हातातील घड्याळ हे ऑडेमार्स पिगट रॉयल ओकचे आहे. त्या घड्याळाची किंमत जवळपास १४ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. ही किंमत ऐकून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करत ‘अंबानींसमोर मार्क झुकरबर्ग यांनाही गरीब असल्यासारखं वाटतंय’, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘पहिल्यांदा इतक्या श्रीमंत व्यक्तींच्या गप्पा ऐकतोय’ अशी मजेशीर कमेंट केली आहे.

अनंत अंबानीचे कधी होणार लग्न?

गेल्या वर्षी १९ जानेवारी रोजी राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु होती. आता १-३ मार्च रोजी लग्नापूर्वीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग