बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या स्टार कपलने पॅपराझींना किंवा इंडस्ट्रीतील लोकांना त्यांच्या नात्याची कल्पना येऊ दिली नाही. इतकी वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या स्टार कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्नाची नोंदणी केली आणि मित्रांसाठी ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले. पण तुम्हाला माहित आहे का सोनाक्षी आणि जहीरने २३ जून रोजी लग्न का केले? तसेच सोनाक्षीने रिसेप्शनला नेसलेल्या लाल रंगाच्या साडीची किंमत तुम्हाला आहे का? चला जाणून घेऊया...
नोंदणी पद्धतीने लग्न झाल्यानंतर सोनाक्षीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने २३ जून २०१७ रोजी तिने आपल्या मैत्रीचे नात्यात रुपांतर केले. त्याच दिवशी ही तारीख दोघांसाठी खास ठरली होती असे म्हटले. सोनाक्षीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (२३.०६.२०१७) आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले होते जे सर्वात सुंदर आहे. आज त्या प्रेमाने आम्हाला सगळ्या अडचणींतून मार्गदर्शन केले आहे. हा सुंदर क्षण इथपर्यंत पोहोचला आहे जिथे आम्ही दोन्ही कुटुंबीयांच्या आणि दोन्ही देवांच्या आशिर्वादाने आता पती-पत्नी झालो आहोत.'
वाचा: सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत; ‘ठरलं तर मग’मधील सहाय्यक दिग्दर्शकाच्या निधनानंतर जुई गडकरीची पोस्ट
सोनाक्षीने आपले लग्न अगदी साध्या पद्धतीने केले होते. लग्नाची नोंदणी करताना तिने आई पूनम सिन्हाची ऑफ व्हाईट साडी परिधान केली होती. रिसेप्शनला ती लाल रंगाची साडी, चूडा आणि सिंदूर लावून आली होती. पण या साडीची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
वाचा: कलाने काजोलला केले निर्दोषी सिद्ध, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आठवडाभरात काय घडले?
सहसा बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या लग्नात लाखो रुपयांचा लेहंगा, दागिने परिधान करताना दिसतात. डेस्टिनेशन वेडिंग, मेकअप आर्टिस्ट, ग्रँड वेन्यू यासाठी त्या कोट्यवधींचा खर्च करतात. पण सोनाक्षीने साध्या साडीत आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नाचे विधी पूर्ण केले. तसेच रिसेप्शनला तिने नेसलेल्या लाल रंगाच्या साडीची किंमत थक्क करणारी आहे. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्रीने बोल्ड रेड शेडची 'चांद बुटा' ब्रोकेड साडी परिधान केली होती. ज्याची किंमत ७९,८०० रुपये आहे.
वाचा: 'अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा', रिअॅलिटीशोमध्ये सांगितला भीतीदायक प्रसंग
सोनाक्षीने लग्नाच्या रिसेप्शनला काही मोजक्याच लोकांना बोलावले होते. त्यामध्ये हिरामंडी वेब सीरिजचे कलाकार होते. तसेच रेखा, सलमान खान, राजकुमार राव आणि इतर बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या