बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने पुन्हा एकदा आपल्या स्टाईलने सर्वांची मने जिंकली. आयफा २०२५ च्या प्री-इव्हेंटमध्ये शाहरुख खानने हजेरी लावली होती. यावेळी त्याचं मनमोहक व्यक्तिमत्व सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान, शाहरूखच्या हातातील घड्याळज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या कार्यक्रमात शाहरुख खानने ऑडेमार पिगुएचे लिमिटेड एडिशन घड्याळ परिधान केले होते. हे घड्याळ १८ कॅरेट वाळूच्या सोन्यापासून बनवलेले आहे. हे खास घड्याळ अतिशय काटेकोरपणे डिझाइन करण्यात आले असून जगभरात अशी केवळ २५० घड्याळे उपलब्ध आहेत.
शाहरुख खानने हातात घातलेल्या ऑडेमार पिगुए यांच्या या घड्याळाची किंमत सुमारे ७६ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. शाहरुखच्या स्टाईल स्टेटमेंटमधून पुन्हा एकदा त्याच्या छंदाची आणि क्लासची झलक पाहायला मिळते. शाहरुखला अशा खास घड्याळांची आवड आहे.
ऑडेमार पिग [आरई] मास्टर हे त्यांच्या उत्कृष्ट घड्याळ्याच्या डिझाइन आणि उच्च गुणवत्तेच्या मेकिंगसाठी खास ओळखले जातात. हे लिमिटेड एडिशन वॉच आहे, ज्याचे केवळ २५० युनिट्स बनवण्यात आले होते. या घड्याळज्याची केस ही सँड गोल्डपासून बनवण्यात आली आहे. प्रकाशात या घड्याळाच्या छटा बदलतात. घड्याळाचा "ब्ल्यू न्यूइट, नुज 50" डायल पीव्हीडी तंत्रज्ञानापासून बनविला गेला आहे, ज्यात १२ वेगवेगळ्या आकाराच्या त्रिकोणी ब्रास प्लेट्स वापरल्या आहेत. यात अल्ट्रा-थिन कॅलिबर 7129 मूव्हमेंट आहे, ज्यामुळे घड्याळ अधिक अचूक आणि बराच वेळ चालणारी बॅटरी मिळते.
आयफा पुरस्कार सोहळा ७ मार्च ते ९ मार्च दरम्यान राजस्थानमधील जयपूर येथे होणार आहे. या तिन्ही इव्हेंट्समध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे यावेळी शाहरुख खानसोबत कार्तिक आर्यनदेखील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
वाचा: कृष्णा अभिषेकने शूज ठेवण्यासाठी खरेदी केला ३ बीएचके फ्लॅट, दर ६ महिन्यांनी बदलते कलेक्शन
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान लवकरच मुलगी सुहानासोबत किंग नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'किंग' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि सिद्धार्थ आनंदसोबत करत आहे. या चित्रपटातून सुहाना खान मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असून अभिषेक बच्चन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या