‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. त्याच्या राहुल, राज, डॉन या भूमिका विशेष गाजल्या होत्या. त्याचे केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर देखील लाखो चाहते आहेत. शाहरुख विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आज २ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी खास गोष्टी...
शाहरुखचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ साली झाला. जन्मानंतर शाहरुखच्या आजीने त्याचे नाव ‘अब्दुल रेहमान’ असे ठेवले होते. मात्र त्यानंतर काही वर्षांनी त्याच्या वडिलांनी नावात बदल केला. त्यावेळी त्याचे नाव ‘शाहरुख’ असे ठेवण्यात आले. लहानपणी तो फार हुशार विद्यार्थी होता. केवळ अभ्यासातच नाही तर हॉकी, फुटबॉलमध्येही अव्वल होता.
वाचा: 'बच्चन' घराण्याची सून ऐश्वर्या रायबद्दल 'या' १० गोष्टी माहितीयेत का?
‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘बाजीगर’, ‘डर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिल तो पागल है’, ‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये शाहरुखने काम केले. त्याच्या संवाद कौशल्याने अनेकांना बोल्ड करुन टाकले आहे. तसेच शाहरुखच्या ‘सिग्नेचर’ पोझवर अनेकजण फिदा आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का शाहरुखने इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी स्वत:चे नाव बदलले आहे. आता शाहरुखचे खरे नाव काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शाहरुखच्या वडिलांचे कॅन्टीन होते. त्यावेळी शाहरुख बराच वेळ तिथेच घालवत असे. तिथे बऱ्याच कलाकारांशी त्याची भेट झाली.
शाहरुखने एका मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्याच्या या मालिकेचे नाव 'फौजी' होते. या पहिल्यावहिल्या मालिकेतून शाहरुखला लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर 'दिवाना' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
संबंधित बातम्या