मुलगी सुहाना की पत्नी गौरी, शाहरुख खानच्या फोनवर कोणाचा आहे वॉलपेपर? चाहत्यांनी काढले शोधून
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुलगी सुहाना की पत्नी गौरी, शाहरुख खानच्या फोनवर कोणाचा आहे वॉलपेपर? चाहत्यांनी काढले शोधून

मुलगी सुहाना की पत्नी गौरी, शाहरुख खानच्या फोनवर कोणाचा आहे वॉलपेपर? चाहत्यांनी काढले शोधून

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 21, 2024 08:25 PM IST

अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या सिनेमांसोबतच नेहमी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता चाहत्यांनी शाहरुखच्या फोनचा वॉलपेपर कोणाचा फोटो आहे हे देखील शोधून काढले आहे.

शाहरुख खान
शाहरुख खान

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या कुटुंबावर किती प्रेम करतो हे सर्वांनाच माहित आहे. शाहरुख खानने अनेकदा आपली तीन मुलं आणि पत्नी गौरी खानवर असलेले प्रेम कायम व्यक्त केले आहे. तो सार्वजनिक ठिकाणी सुहाना आणि अबरामची विशेष काळजी घेताना देखील दिसतो. आता शाहरुख खानच्या फोनचा वॉलपेपर व्हायरल होत आहे. हा वॉलपेपर पाहून शाहरुख खानचे चाहते पुन्हा एकदा त्याच्यावर फिदा झाले आहेत. शाहरुखच्या वॉलपेपरवर सुहाना किंवा गौरी खानचा फोटो नसून या खास व्यक्तीचा फोटो आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ही खास व्यक्ती आहे तरी कोण?

शाहरुख खानच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?

शाहरुख खानचा लग्झरी कार, बंगला, कपडे, कुटुंबीय, तो कोणता फोन वापरतो हे सर्व जाणून घेण्यासाठी आतुर असतात. आता शाहरुखच्या फोनवर असलेल्या वॉल पेपरची चर्चचा रंगली आहे. त्याच्या फोन वॉल पेपरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये शाहरुखच्या फोनवर त्याचा धाकटा मुलगा अबराम खानचा फोटो असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका युजरने शाहरुख खानच्या वॉलपेपरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत शाहरुखचा फोन दिसत आहे. त्याचवेळी त्या फोनवर अबराम खानचा एक फोटो दिसत आहे.

 

चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

सोशल मीडियावर शाहरुखच्या फोनचा वॉलपेपर व्हायरल झाल्यावर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. एका यूजरने, शाहरुखच्या व्हिडीओवर कमेंट करत, 'सगळे जण गुप्तहेर आहेत. त्याच्या फोनमध्ये काय आहे? हा त्याचा फोन आहे असे आपण धरुन चालू' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, 'अरे वाह शाहरुखने त्याचा मुलगा अबरामचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवला आहे' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'शाहरुख खानचे त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे' असे म्हटले आहे.
वाचा: अभिनेत्याच्या मृत्यूला पत्नीने नाना पाटेकरांना ठरवले होते जबाबदार, नेमकं काय घडलं होतं?

शाहरुखच्या मुलांविषयी

तुम्हाला माहिती आहे का, शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान आहे. त्याचा जन्म १९९७ साली झाला होता. त्यानंतर शाहरुखची मुलगी सुहाना खानचा जन्म २००० साली झाला. त्यानंतर २०१३मध्ये शाहरुखला तिसरा मुलगा झाला. अबराम हा सरोगसीच्या माध्यमातून झालेला मुलगा आहे. शाहरुखच्या तिन्हीही मुलांची कायम चर्चा रंगलेली असते. सुहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे तर आर्यनची वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner