अनंत आणि राधिकाच्या हळदी समारंभाला सलमान खानने घातलेल्या घड्याळाची किंमत माहिती आहे का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अनंत आणि राधिकाच्या हळदी समारंभाला सलमान खानने घातलेल्या घड्याळाची किंमत माहिती आहे का?

अनंत आणि राधिकाच्या हळदी समारंभाला सलमान खानने घातलेल्या घड्याळाची किंमत माहिती आहे का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 11, 2024 08:20 AM IST

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या अंबानी कुटुंबीयांच्या आनंदात सहभागी झाला आहे. नुकताच पार पडलेल्या अनंत अंबानीच्या हळदी सोहळ्याला त्याने हजेरी लावली. त्यावेळी त्याच्या हातात असलेल्या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधले.

salman khan Watch
salman khan Watch

सध्या संपूर्ण देशात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंतच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या १२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न होणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग विधींना सुरुवात झाली आहे. सोमवारी दोघांचा हळदीचा सोहळा पार पडला. कुटुंबातील सदस्यांसोबतच बॉलिवूडचे अनेक सेलेब्सही या सोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान, बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सलमान खानचा लूक, त्याच्या हातातील घड्याळ सर्वकाही चर्चेचा विषय ठरत होते.

सलमान खानचे घड्याळ

अभिनेता सलमान खानने अनंत अंबानीच्या हळदी समारंभात स्वॅगमध्ये एण्ट्री केली. त्याने सुरुवातीला काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्यानंतर हळदीची थिम ही पिवळ्या रंगाची असल्यामुळे सलमानने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला. या सगळ्यात सलमानने घातलेल्या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सलमानच्या या घड्याळाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
वाचा: कार्टून नेटवर्क बंद होणार? सोशल मीडियावरील या ट्रेंडमागचे सत्य काय?

घड्याळाची किंमत

सलमानचे हे घड्याळ खास त्याच्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे घड्याळ प्रतिष्ठित ब्रँड Patek Philippe चे असल्याचे समोर आले. Aquanaut Luce Rainbow Minute Repeater Haute Joaillerieचे हे घड्याळ आहे. या घड्याळाचे फिचर अतिशय सुंदर आहेत. तसेच या घड्याळाची किंमत २८ लाख ८ हजार ९०१ डॉलर्स आहे. भारतीय चलनानुसार २३ कोटी ४५ लाख १२ हजार ५४ रुपये आहे. भाईजानच्या या घड्याळावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
वाचा: फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता शिवाजी पार्कात चढला झाडावर, काय आहे प्रकरण?

सलमान आणि रणवीरने यापूर्वी अनंत-राधिकाच्या संगीत समारंभात परफॉर्म केले होते. रणवीरने सलमानच्या नो एण्ट्री गाण्यावर डान्स केला होता. तर सलमानने अनंतसोबत पहिल्यांदाच हर दिल जो प्यार करेगा चित्रपटातील ऐसा हुआ है गाण्यावर डान्स केला. तसेच या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बीबरने परफॉर्म करत चार चाँद लावले होते.
वाचा: सत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

अनंत आणि राधिकाच्या लग्नाविषयी

अनंत आणि राधिकाच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर १२ जुलै रोजी दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. ज्या लग्नाचे प्री-वेडिंग इतके भव्य झाले आहे, त्या लग्नात काय धमाका होणार हे पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असल्याने चाहते हे लग्न पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Whats_app_banner