मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nita Ambani : नीता अंबानींच्या मेकअप आर्टिस्टचा पगार माहितीये का? जाणून घ्या

Nita Ambani : नीता अंबानींच्या मेकअप आर्टिस्टचा पगार माहितीये का? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 26, 2023 01:10 PM IST

Nita Ambani Makeup Artist: नीता अंबानी यांचा मेकअप आर्टिस्ट कोण आहे? त्याचा पगार तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या...

Nita Ambani
Nita Ambani

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी हे ओळखले जातात. त्यांची पत्नी नीता अंबानी देखील एक बिझनेस वूमन आहे. त्या एक उत्कृष्ट नृत्यांगना, फॅशनिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. नीता अंबानी यांचे सौंदर्य एका तरुणीला लाजवेल असे आहे. पण त्यांचा मेकअप आर्टिस्ट कोण आहे? त्याला किती पगार आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो.

नीता अंबानी या प्रत्येक कार्यक्रमात ग्लॅमरस अंदाजात दिसतात. एखाद्या अभिनेत्रीलाही मागे टाकेल असा त्यांचा लूक असतो. त्यांचे कपडे आणि लूक नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. वयाच्या ५९व्या वर्षी देखील नीता अंबानींना अतिशय सुंदर मेकप करणारा आर्टिस्ट म्हणजे मिकी कॉन्ट्रॅक्टर. ते अंबानी कुटुंबीयांचे मेकअप आर्टिस्ट आहेत.
वाचा: मालिका, चित्रपट, वेबसीरिज... पिळगावकरांची श्रिया जिंकतेय चाहत्यांची मनं

मिकी हे केवळ नीता अंबानीच नाही तर त्यांची मुलगी ईशा, सून श्लोका मेहता या दोघींचाही मेकअप करतात. मिकी अंबानी कुटुंबीयांसाठी मेकअपआर्टिस्ट म्हणून काम करण्यापूर्वी टोकियोमध्ये हेअर आर्टिस्ट म्हणून काम करत होते. जेव्हा अभिनेत्री हेलन त्यांना भेटल्या तेव्हा त्यांनी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा सल्ला दिला. आज मिकी हे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, मिकी हे एका व्यक्तीच्या मेकअपसाठी एका वेळी ७५ हजार ते १ लाख रुपये इतकी फी घेतात. मिकी हे इंडस्ट्रीतील सर्वात व्यग्र व सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या मेक-अप आर्टिस्टपैकी एक आहेत.

नुकताच नीता अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट मुंबईत उभा करण्यात आला आहे. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' ३१ मार्च रोजी उभारण्यात आले. या कल्चर सेंटरच्या ओपनींगला जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

IPL_Entry_Point

विभाग