ऐश्वर्या रायच्या 'निंबोडा-निंबोडा' गाण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? ऐकून येईल हसू!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ऐश्वर्या रायच्या 'निंबोडा-निंबोडा' गाण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? ऐकून येईल हसू!

ऐश्वर्या रायच्या 'निंबोडा-निंबोडा' गाण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? ऐकून येईल हसू!

Dec 28, 2024 10:00 AM IST

Nimbooda-Nimbooda Song : ऐश्वर्या रायवर चित्रित झालेले हे गाणे १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात होते. हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते.

Nimbooda Nimbooda Song Meaning
Nimbooda Nimbooda Song Meaning

Nimbooda-Nimbooda Song Meaning : बॉलिवूड चित्रपटातील गाण्यांची एक वेगळीच ओळख आहे. गाण्याचे बोल, संगीत, आणि त्यातल्या नृत्याच्या चाली लोकांच्या मनात कायमचा ठसा सोडतात. बॉलिवूडमधील असेच एक गाजलेले गाणे म्हणजे ‘निंबोडा निंबोडा’. ऐश्वर्या रायवर चित्रित झालेले हे गाणे १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात होते. हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. या गाण्यामुळे राजस्थानचे लोकसंगीत आणि भारतीय संस्कृतीचे विविध रंग सगळ्यांना दिसले आहेत . ऐश्वर्या रायने आपल्या आकर्षक नृत्याने गाण्याची लोकप्रियता आणखी वाढवली, तर गाण्यातील शब्द आणि संगीत यावर चांगलीच चर्चा रंगली होती. या गाण्याचा अर्थ अनेकांना कदाचित माहीतच नसेल.

‘निंबोडा निंबोडा’चा अर्थ आणि पार्श्वभूमी

‘निंबोडा निंबोडा’ हे गाणे राजस्थानमधील पारंपरिक लोकगीत आहे. पहिल्यांदा हे गाणे गाझी खान मणियार यांनी १८९२ मध्ये गायले होते. राजस्थानच्या मंगनियार समाजातील लोक हे गाणे मोठ्या आनंदाने गायला लागले, आणि त्यातल्या शब्दांनी विविध प्रकारच्या भावना व्यक्त करण्यास मदत केली. या गाण्यात मुख्यत: एक भावनिक संवाद आहे, जो नववधू आणि तिच्या नवऱ्यामधील आहे. या गाण्यातून नववधू आपल्या पतीसोबत गप्पा मारताना लाजत लाजत लिंबू मागते, हाच या गाण्याचा मुख्य आशय आहे. असं म्हटलं जातं की, त्या काळी राजस्थानमध्ये लिंबू आणि संत्री सारख्या फळांची उपलब्धता कमी होती, आणि म्हणून नववधू आपल्या पतीकडे लिंबू घेऊन येण्याचा हट्ट करायची.

Nana Patekar Son दिसायला हुबेहूब वडिलांसारखाच ! काय करतो नाना पाटेकर यांचा एकुलता एक मुलगा?

बॉलिवूडमध्ये आले ‘निंबोडा निंबोडा’!

'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या माध्यमातून ‘निंबोडा निंबोडा’ हे गाणे बॉलिवूडमधून लाखो लोकांपर्यंत पोहोचले. या गाण्यात ऐश्वर्या रायने आकर्षक नृत्य केले, आणि सलमान खान व अजय देवगण यांच्या उपस्थितीमुळे गाण्याचा प्रभाव अधिकच वाढला. गाण्यातील संगीत, रचनात्मकता, आणि शब्द लोकांच्या मनाला भिडले. या गाण्याला कविता कृष्णमूर्ती आणि करसन सरगठिया यांनी स्वर दिले होते, आणि या गाण्याची पार्श्वभूमी अशी बनवली की, ती राजस्थानच्या पारंपरिक लोकसंगीताची एक आदर्श उदाहरण बनली.

चित्रपटातील गाणे ऐकताना लोकांनी सहजपणे गाण्याच्या शब्दांची गोडी लागली आणि गाण्याचे बोल ‘निंबोडा निंबोडा’ सगळ्यांनाच खूप आवडले. गाण्याची लोकप्रियता एवढी वाढली की त्याला यूट्यूबवर १३२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रपटाच्या वेळेस हे गाणे जितके चर्चेत होते, तितकेच ते आजही आहे. 

आजही हे गाणे लोकांमध्ये लोकप्रिय आहे. राजस्थानच्या लोकगीतांचा गोडवा, ऐश्वर्याचे नृत्य आणि गाण्याचे संगीत – सर्वच बाबी मिळून बनलेले ‘निंबोडा निंबोडा’ हे गाणे तुफान गाजले.

Whats_app_banner