पहिल्या पत्नीला दागिन्यांसह दिला अग्नी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहिती आहे का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पहिल्या पत्नीला दागिन्यांसह दिला अग्नी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहिती आहे का?

पहिल्या पत्नीला दागिन्यांसह दिला अग्नी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहिती आहे का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Oct 07, 2024 07:02 PM IST

Laxmikant Berde: दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दोन लग्न केली आहेत. त्यांचा पहिला संसार १५ वर्षे टीकला. पण एक दिवस अचानक त्यांच्या पत्नीला त्रास होऊ लागला. त्यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले.

laxmikant berde first wife
laxmikant berde first wife

Laxmikant Berde First Wife: मराठीतला सुपरस्टार अभिनेता म्हणून नेहमीच लक्ष्मीकांत बेर्डे ओळखले जातात. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे कायमच त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायचे. त्यांनी दोन लग्न केली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रुही बेर्डे असे त्यांच्या पत्नीचे नाव होते. पण रुही या कोण होत्या? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

रुही बेर्डे यांच्याविषयी

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी रुही बेर्डे या देखील एक उत्तम अभिनेत्री होत्या. रुही यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केले होते. रुही बेर्डे यांचे मूळ नाव पद्मा होते. त्यांचे पडद्यावरील नाव रुही असे होते. रुही या मूळच्या मुंबईच्या होत्या. फार कमी जणांना माहित असेल कि रुही यांनी त्यांचा करियरची सुरुवात हिंदी चित्रपट सृष्टीपासून केली होती. ‘आ गले लग जा’ हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला, या चित्रपटात त्यांनी शत्रूग्न सिंह यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

रुही बेर्डे यांच्या करिअरविषयी

रुही यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकांपासूनच झाली होती. डार्लिंग डार्लिंग हे त्यांचं नाटक फारच लोकप्रिय ठरलं. या नाटकातल्या भूमिकेमुळे रुही यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. १९७३ साली ‘जावई विकत घेणे आहे’ या चित्रपटातुन त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केल. दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार या गाजलेल्या चित्रपटात देखील त्या झळकल्या होत्या. त्यानंतर रुही यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

रुही आणि लक्ष्मीकांत यांची पहिली भेट

रुही आणि लक्ष्मीकांत यांची पहिली भेट 'वेडी माणसं' या नाटकाचा दरम्यान झाली. मात्र नाटक फार चाललं नाही. त्यानंतर पुन्हा एकदा 'कश्यात काय लफड्यात पाय' या नाटकाच्या निमित्ताने ते एकत्र आले. याच दरम्यानच दोघांचे सूत जुळले. लक्ष्मीकांत बेर्डे यांना ज्या नाटकामुळे प्रसिद्धी मिळाली त्या 'शांतेच कार्ट चालू आहे' या नाटकात देखील दोघांनी एकत्र काम केले.

लक्ष्यासाठी रुहीने घेतला इंडस्ट्रीमधून ब्रेक

१९८३ साली रुही आणि लक्ष्मीकांत यांनी लग्न केले. रुही ही लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातील खरी लक्ष्मी ठरली होती. लग्नानंतर लक्ष्मीकांत यांची कारकिर्दीची गाडी सुसाट सुटली होती. या काळात रुही मराठी इंडस्त्रीमधील मोठ्या स्टार होत्या. मात्र लग्नानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या करिअरला ऊभारी येताना पाहून रुही यांनी अभिनय कारकिर्दीला काही काळ ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. लोकप्रिय अभिनेत्री असून आणि नाटक सिनेमांचा ऑफर येत असताना देखील आपल्या पतीसाठी त्यांनी घर संसारावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा ठरवलं.

१९९८ साली रुही यांचे निधन झाले

मात्र रुही आणि लक्ष्मीकांत यांचा संसार फार काळ फुलू शकला नाही. त्यांच्या १५ वर्षांच्या संसारवर काळाने घाला घातला. एक दिवस रुही बेर्डे अंधेरी येथून गाडीत प्रवास करत असताना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरु झाला होता. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र काही दिवसाच्या उपचारानंतर ५ एप्रिल १९९८ रोजी रुही यांचे निधन झाले. रुही यांचा जाण्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मनावर फार मोठा आघात झाला होता. त्यांना मोठा धक्का बसला होता.
वाचा: बॉलिवूडमध्ये १९८०साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामुळे झाले होते रेल्वेचे नुकसान, चित्रपटही ठरला फ्लॉप

लक्ष्मीकांत बेर्डे यांची जवळची मैत्रीण लेखिका वसुंधरा साबळे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, "रूही खरच लक्ष्याची लक्ष्मी होती. तिच्या पायगुणाने लक्ष्या प्रसिद्धीच्या आणि ऐश्वर्याच्या शीखरावर पोहोचला. तिचा जाण्याने लक्ष्या खचून गेला होता. तो इतका खचला की नंतर त्याने कधीच उभारी धरली नाही...तो बरेच दिवस मित्रांशी देखील बोलत नव्हता. रुही गेल्यावर स्मशानभूमीत अग्नी देताना तिचा अंगावरचा एकही अलंकार न काढू देणारा लक्षा, तिच्या पार्थिवासमोर निशब्द उभा होता."

Whats_app_banner