‘बर्थडे गर्ल’ तेजस्विनी पंडितने कोणत्या चित्रपटातून केली होती करिअरची सुरुवात? ‘या’ चित्रपटांनी मिळवून दिली ओळख!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘बर्थडे गर्ल’ तेजस्विनी पंडितने कोणत्या चित्रपटातून केली होती करिअरची सुरुवात? ‘या’ चित्रपटांनी मिळवून दिली ओळख!

‘बर्थडे गर्ल’ तेजस्विनी पंडितने कोणत्या चित्रपटातून केली होती करिअरची सुरुवात? ‘या’ चित्रपटांनी मिळवून दिली ओळख!

May 23, 2024 07:45 AM IST

तेजस्विनी पंडितने आजवर अनेक चित्रपट, मालिका आणि सीरिज मध्ये काम केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का तेजस्विनी पंडित हिचा पहिला चित्रपट कोणता होता?

‘बर्थडे गर्ल’ तेजस्विनी पंडितने कोणत्या चित्रपटातून केली होती करिअरची सुरुवात? ‘या’ चित्रपटांनी मिळवून दिली ओळख!
‘बर्थडे गर्ल’ तेजस्विनी पंडितने कोणत्या चित्रपटातून केली होती करिअरची सुरुवात? ‘या’ चित्रपटांनी मिळवून दिली ओळख!

आपल्या दमदार अभिनयासोबतच निखळ सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचा आज (२३ मे) वाढदिवस आहे. नाटक, मालिका, चित्रपट ते वेब सीरिज अशा प्रत्येक माध्यमातून तिने प्रेक्षकांचे भाभ्रून मनोरंजन केले आहे. सोशल मीडियावर देखील नेहमीच चर्चेत असणारी तेजस्विनी पंडित तिच्या बेधडक अंदाजामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक चित्रपट, मालिका आणि सीरिज मध्ये काम केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का तेजस्विनी पंडित हिचा पहिला चित्रपट कोणता होता? चला एक नजर टाकूया तिच्या गाजलेल्या ५ चित्रपटांवर...

अगं बाई अरेच्चा!

तेजस्विनी पंडितने 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. २००५मध्ये आलेला केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट 'व्हॉट वुमन वॉन्ट' या हॉलिवूड चित्रपटावर आधारित होता. हा चित्रपट मुंबईसारख्या महानगरात राहणाऱ्या सामान्य माणसाचे जीवन आणि समस्या दाखवणारा होता. या चित्रपटात संजय नार्वेकर यांनी मुख्य भूमिका केली आहे. या चित्रपटात तेजस्विनीने नकारात्मक भूमिका साकारली होती.

आजी घेणार लीलाकडून मोठं वचन! करावं लागणार का एजेशी लग्न? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत मोठं वळण

मी सिंधुताई सपकाळ

तेजस्विनी पंडित रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे; तथापि, अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित 'मी सिंधुताई सपकाळ' या बायोपिकद्वारे तिने इंडस्ट्रीमध्ये आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले. हा चित्रपट सिंधुताई सपकाळ यांच्या वास्तविक जीवनावर आधारित होता. तेजस्विनीने या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी खूप वाहवा मिळवली.

ये रे ये रे पैसा

जर तुम्ही मराठी इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट कॉमेडी-ड्रामा चित्रपट शोधत असाल, तर संजय जाधवचा 'ये रे ये रे पैसा' आवर्जून पाहावा. उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडित यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक होता. चित्रपटाचे कथानक तुम्हाला पूर्णवेळ गुंतवून ठेवते. यातील ‘बबली’च्या भूमिकेत तेजस्विनी पंडित नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरली आहे.

साक्षी विरोधात पुरावे गोळा करण्याची संधी चैतन्यकडे चालून येणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये येणार नवं वळण

तू ही रे

संजय जाधव दिग्दर्शित 'तू ही रे' हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात एक सुंदर प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. तिन्ही कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचा क्लायमॅक्स चित्तथरारक आणि रोमांचक आहे.

देवा

मुरली नल्लाप्पा दिग्दर्शित 'देवा' हा मल्याळम चित्रपट 'चार्ली'चा अधिकृत रिमेक होता. अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला, 'देवा' हा चित्रपट मायाचे जीवन दाखवतो, जी एक लेखिका आहे आणि तिच्या पुढच्या पुस्तकासाठी चांगली कथा शोधत आहे. या दरम्यान, तिला निखळ मनाचा देवा भेटतो आणि ती त्याची कथा लिहिते. या चित्रपटात तेजस्विनीने ‘माया’ची भूमिका केली आहे.

Whats_app_banner